बॉलिवूड अभिनेत्रीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं! मेहनतीने झाली हक्काच्या घराची मालकीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 09:34 IST2026-03-15T09:13:36+5:302026-03-15T09:34:11+5:30
बॉलिवूड अभिनेत्रीने पूर्ण केलं मुंबईकर होण्याचं स्वप्न! खरेदी केलं हक्काचं घर, भावुक होत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्रीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं! मेहनतीने झाली हक्काच्या घराची मालकीण
Bollywood Actress Sanya Malhotra New Home: मायानगरी मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकांचं स्वप्न असतं. अनेक जण अथक प्रयत्न आणि परिश्रम करून हे स्वप्न साकार करतात. अगदी सामान्य माणूस असो किंवा एखादा सेलिब्रिटी प्रत्येकाचं हे स्वप्न असतं. अशातच नुकतंच एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीचं गृहस्वप्न साकार झालं आहे.या अभिनेत्रीचं नाव सान्या मल्होत्रा आहे.
'दंगल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत तिने इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. हा चित्रपट तिच्या करिअरसाठी मैलाचा दगड ठरला. सान्याने आजवर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करून आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. दंगल चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीचं नुकतंच गृहस्वप्न साकार झालं आहे.
सान्या मल्होत्रानेमुंबईत स्वतःचं नवीन घर खरेदी केलं आहे. अभिनेत्रीला तिच्या अनेक वर्षांच्या मेहनतचं फळ मिळालं आहे.
दरम्यान, नुकताच अभिनेत्रीने तिच्या मुंबईतील हक्काच्या घरात पाऊल ठेवलं. सान्याने सोशल मीडियावर नवीन घराचे फोटो शेअर केलेत. त्याचबरोबर नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवत तिने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. सान्याने लिहिलंय की, "हर हर महादेव. वर्षानुवर्षे मी स्वप्न पाहिलं, कठोर परिश्रम केले, शिकले आणि पुढे जात राहिले. या घराची प्रत्येक भिंत मला आठवण करून देईल की संयम आणि श्रद्धेचे परिणाम किती सुंदर असू शकतात. आणि या सर्वांमधून, माझ्या कुटुंबाचा आणि मित्रांचा विश्वास नेहमीच माझी सर्वात मोठी ताकद राहिली आहे. हे फक्त एका घरापेक्षा जास्त आहे. माझ्या प्रवासाचा हा एक छोटासा भाग आहे. माझ्या घरात आपले स्वागत आहे." अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे.
सान्या मल्होत्राच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी अभिनेत्रीचं तिच्या घराबद्दल भरभरून कौतुक केलं आहे. २०२३ मध्ये सान्या मल्होत्राने गुडगावमध्ये एक घर देखील खरेदी केलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्रीने मुंबईत घर घेतलं आहे.