प्रेमासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या! मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न करण्यावर काय म्हणाली रिचा चड्डा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:08 IST2025-08-14T13:03:35+5:302025-08-14T13:08:15+5:30
धर्माच्या भिंती ओलांडल्या अन् मुस्लिम अभिनेत्यासोबत थाटला संसार, आंतरधर्मीय लग्नाबद्दल रिचा चड्डाची प्रतिक्रिया, म्हणाली...

प्रेमासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या! मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न करण्यावर काय म्हणाली रिचा चड्डा?
Richa chadha : अभिनेत्री रिचा चड्डा (Richa chadha) आणि अली फजल हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. जवळपास पाच वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचं हे लग्न आंतरधर्मीय असून दोघांनीही हे नातं खुलेपणाने स्वीकारलं आहे. अलिकडेच रिचा आणि अली फजल यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अशातच आता दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने आंतरधर्मीय लग्नाविषयी भाष्य केलं आहे.
रिचा चड्डा आणि अली फजल यांची लव्हालाईफ कोणापासूनही लपलेली नाही. फुकरे चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्यातील नातं बहरत गेलं. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिचा चड्डा त्यांच्या लग्नाविषयी भरभरुन बोलली. त्यावेळी अभिनेत्रीने म्हटलं, "मी आणि अलीने आंतरधर्मीय लग्न केलं. या नात्यातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. माझे वडील पंजाबी आणि आई बिहारी आहे. त्यांनी ८०च्या काळात लग्न केलं. त्यांनी उत्तम संस्कार माझ्यावर केले. भले मी आणि अली धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी दृष्टिकोन असलेले असू तरीही आम्ही एकमेकांच्या धर्मांचा आदर करतो."
त्यानंतर पुढे अभिनेत्रीने ईदला अली फजलच्या लखनऊमधील घरी आवर्जून जाते असं म्हटलं. त्याविषयी बोलताना रिचाने सांगितलं, "ईदच्या दिवशी लखनऊ येथील घरी मुस्लिमच नाहीतर इतर धर्माचे लोकही येतात. त्यांच्या घराच्या डावीकडे जैन समुदायाचे लोक राहतात. त्यांच्यासाठी देखील वेगळं जेवण केलं जातं. इतकंच नाही अलीची आजी ९० वर्षांची आजी खुप उत्तम पान बनवते. त्या सगळ्यांना एकत्र पाहून खूप छान वाटतं." अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अली फजलची नुकतीच 'मिर्झापूर 3' वेबसीरिज रिलीज झाली. सध्या ही सीरिज ट्रेंडिंगमध्ये आहे. तर रिचाही संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजमध्ये झळकली होती. तिच्या अभिनयाचंही जोरदार कौतुक झालं.