करिश्मा कपूरसोबतच्या कॅट फाइटबद्दल रवीना टंडन पहिल्यांदाच झाली व्यक्त, असं काय घडलेलं? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:58 IST2025-05-29T17:49:53+5:302025-05-29T17:58:24+5:30

बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्रींच्या कॅट फाइटचे अनेक किस्से आहेत.

bollywood actress raveena tandon speaks out for the first time about her cat fight with karishma kapoor know about what exactly happened | करिश्मा कपूरसोबतच्या कॅट फाइटबद्दल रवीना टंडन पहिल्यांदाच झाली व्यक्त, असं काय घडलेलं? जाणून घ्या 

करिश्मा कपूरसोबतच्या कॅट फाइटबद्दल रवीना टंडन पहिल्यांदाच झाली व्यक्त, असं काय घडलेलं? जाणून घ्या 

Raveena And Karisma Cat Fight : बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्रींच्या कॅट फाइटचे अनेक किस्से आहेत. या यादीमध्ये करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांचं नाव देखील आहे. अभिनेत्री रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांनी आपल्या अभिनयाने  ९० चा काळ गाजवला. परंतु अंदाज अपना अपना या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यामध्ये काही कारणामुळे वाद झाला आणि या दोघींमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं. परंतु, इतक्या वर्षांनंतर, रवीना टंडनने या प्रकरणावर आपले मौन सोडलं आहे. त्यावेळी सेटवर नेमकं काय घडलं होतं? याबद्दल अभिनेत्रीने खुलासा केला आहे. 

दरम्यान, करिश्मा किंवा रवीना यांपैकी कोणीही, कधीही माध्यमांसमोर त्यांच्यातील वादावर बोललं नव्हतं. पहिल्यांदाच, अभिनेत्री रवीना टंडनने फराह खानशी बोलताना करिश्मासोबतच्या तिच्या भांडणाबद्दल उघडपणे सांगितलं. तर फराह खानने तिच्या यूट्यूब चॅनेलवर रवीनाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये अभिनेत्री म्हणाली, "तू सगळीकडे जाऊन सांगितलंस की आमची भांडणे होत आहेत. आमच्यामध्ये का भांडण होत होती? आम्ही कशावरून भांडलो? मी फक्त माझं काम करत होते आणि माझ्या मैत्रिणी असलेल्या डान्सर मुलींसोबत गप्पा मारत बसले होते. असं म्हणत अभिनेत्री फराह खानवर चिडली.
 
यापुढे रवीना टंडनने फराह खानला भांडणाचं खरं कारण सांगत असताना फराह बाजू सावरत म्हणाली, "आता सगळ्यांचीच मुलं एकाच शाळेत शिक्षण घेतात आणि त्यादरम्यान, शाळेच्या वार्षिक कार्यक्रमांमध्ये आम्ही एकमेकांना भेट होतच असेल. फराह खानला सहमती दर्शवत रवीना म्हणाली, आम्ही त्यावेळी लहान होतो, जास्तीत जास्त २०-२१ वर्षांचे असू. तेव्हाची परिस्थिती देखील अगदी शाळेत असल्याप्रमाणेच होती. शिवाय प्रत्येकाला अशा गोष्टींतून जावं लागतं. असं म्हणत अभिनेत्रीने या वादावर पडदा टाकला. 

Web Title: bollywood actress raveena tandon speaks out for the first time about her cat fight with karishma kapoor know about what exactly happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.