"मी आणि अक्षय आता...", ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी रवीना टंडनचा खुलासा, शिल्पा शेट्टीचा उल्लेख करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:05 IST2026-02-17T10:00:59+5:302026-02-17T10:05:23+5:30

"आम्ही आयुष्यात खूप पुढे गेलो आहोत...", अक्षय कुमारसोबतच्या नात्याबद्दल रवीना टंडन स्पष्टच बोलली

bollywood actress raveena tandon open up about bond with ex akshay kumar and shilpa shetty says | "मी आणि अक्षय आता...", ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी रवीना टंडनचा खुलासा, शिल्पा शेट्टीचा उल्लेख करत म्हणाली...

"मी आणि अक्षय आता...", ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी रवीना टंडनचा खुलासा, शिल्पा शेट्टीचा उल्लेख करत म्हणाली...

Raveena Tandon: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हे इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत असणारं नाव आहे. सुंदर बोलके डोळे आणि मोहक हास्याने अनेक सिनेरसिकांना क्लीनबोल्ड करणारी ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. रवीना तिच्या अभिनय कारकीर्दीत चित्रपटांइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. इंडस्ट्रीत रवीना टंडनचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. अक्षय कुमारसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती हे दोघेही लग्नही करणार होते मात्र त्यांचा साखरपुडा मोडला. लवकरच रवीना 'वेलकम टू द जंगल' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने ती बऱ्याच काळानंतर अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने अक्षय कुमारसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे. 

एक काळ असा होता जेव्हा हे दोघे एकमेकांना डेट करायचे. त्यांच्या साखरपुडा देखील झाला होता,  मात्र त्यांचं लग्न मोडल्यानंतर दोघांनीही आपला मार्ग बदलला. रवीना 
आणि अक्षय कुमार यांचं नातं त्याकाळी एक हॉट टॉपिक होता. मिडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी अक्षय आणि रवीना यांच्या नात्यात शिल्पामुळे दुरावा आला होता अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. परंतु, आता इतक्या वर्षानंतर या दोघांबरोबर रवीनाचं नातं कसं याबद्दल तिने झुम ला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने भाष्य केलं. ती म्हणाली,"आता आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो आहोत. तेव्हा आम्ही सगळे तरुण होतो आणि एकाच इंडस्ट्रीत काम करायचो. त्यामुळे ज्याच्या इंडस्ट्रीत लिंक-अप, ब्रेकअप किंवा रिलेशनशिपच्या चर्चा झाल्या नसतील असा कोणीही कलाकार सापडणार नाही."

मग ती म्हणाली,"आज, मी आणि अक्षय आता चांगले मित्र आहोत. शिवाय शिल्पा  सुद्धा माझी चांगली मैत्रीण बनली आहे.  आम्ही आमच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलो आहोत. आम्ही आमच्या कुटुंबात आणि मुलांमध्ये आनंदी आहोत." अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने यावेळी दिली. 

दरम्यान, १९९१ मध्ये 'पत्थर के फुल' चित्रपटातून रवीनाने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं. आपल्या आजवरच्या कारकि‍र्दीत तिने इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 'मोहरा', 'दिलवाले', 'अंदाज अपना अपना' बड़े मियां छोटे मियां', 'राजाजी', 'अनाड़ी नंबर 1', 'परदेसी बाबू','बारूद'आणि ' जिद्दी' या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. 22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. 

Web Title : रवीना टंडन ने अक्षय कुमार के ब्रेकअप पर सालों बाद खुलासा किया।

Web Summary : रवीना टंडन ने अक्षय कुमार के साथ अपने पुराने रिश्ते पर बात की, शिल्पा शेट्टी का जिक्र किया। वे आगे बढ़ गए हैं, अब दोस्त हैं, अपने परिवारों के साथ खुश हैं। रवीना जल्द ही 'वेलकम टू द जंगल' में दिखेंगी।

Web Title : Raveena Tandon opens up about Akshay Kumar breakup after years.

Web Summary : Raveena Tandon discusses her past relationship with Akshay Kumar, mentioning Shilpa Shetty. They've moved on, now friends, happy with their families. Raveena is soon appearing in 'Welcome to the Jungle'.