२१ व्या वर्षी दोन मुलींची आई, प्रेमात धोका मिळाला अन् घेतलेला टोकाचा निर्णय; कोण आहे 'ही' सुंदरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:50 IST2025-10-26T13:34:38+5:302025-10-26T13:50:45+5:30
२१ व्या वर्षी दोन मुलींची आई, प्रेमात धोका मिळाला अन् घेतलेला टोकाचा निर्णय,सौंदर्याची आजही होते चर्चा

२१ व्या वर्षी दोन मुलींची आई, प्रेमात धोका मिळाला अन् घेतलेला टोकाचा निर्णय; कोण आहे 'ही' सुंदरी?
Bollywood Actress: हिंदी चित्रपटांतील यशस्वी नायिकांच्या नावांचा विचार केल्यावर शेकडो चेहरे चित्रपटाच्या रीलसारखे आपल्या डोळ्यांसमोर येऊ लागतात. त्या चेहऱ्यांमध्ये असे काही चेहरे असतात ज्यांच्यावर केवळ नजरच थांबत नाही तर हे चेहरे आणि त्यांचे नाव वर्षानुवर्षेच नव्हे तर अनेक दशकांपासून चित्रपट रसिकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. आपल्या वेगळ्या अभिनयशैलीने या नायिका आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. आज या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे.
१९९१ मध्ये 'पत्थर के फुल' चित्रपटातून रवीनाने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत तिने इंडस्ट्रीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 'मोहरा', 'दिलवाले', 'अंदाज अपना अपना' बड़े मियां छोटे मियां', 'राजाजी', 'अनाड़ी नंबर 1', 'परदेसी बाबू','बारूद'आणि ' जिद्दी' या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. वयाच्या १७ व्या वर्षीच रवीनाने अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. रवीना टंडनने सलमान खान, आमिर खान आणि अनिल कपूरपासून ते अक्षय कुमार, अजय देवगण यांसारख्या स्टार्ससोबत काम केले आहे. ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील टॉप हिरोइनपैंकी ती एक होती.पण, रवीना तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत होती.
रवीना टंडनने वयाच्या २१ व्या वर्षी दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यांची नावं छाया आणि पूजा आहेत. रवीनाने छायाला दत्तक घेतली तेव्हा ती ११ वर्षांची होती आणि तिची धाकटी मुलगी पूजा ८ वर्षांची होती.छाया आणि पूजा या रवीनाच्या चुलत भावाच्या मुली होत्या, ज्याचे अचानक निधन झाले होते. आता पूजा एअर हॉस्टेस आहे तर छाया इव्हेंट मॅनेजर आहे. छायाचं लग्नही झालं असून तिला दोन मुलंही आहेत.
ब्रेकअपमुळे केलेला स्वतला संपवण्याचा प्रयत्न
दरम्यान, इंडस्ट्रीत रवीना टंडनचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं. अजय देवगणसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती अशी एकेकाळी खूप चर्चा झाली होती. 'दिलवाले' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रवीना टंडन आणि अजय देवगण यांच्यात जवळीक निर्माण झाली, परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.अजयपासून वेगळे झाल्यानंतर रवीनाने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, अजयने याचं खंडण केलं होतं. त्यानंतर रवीनाने वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. 22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे.