राणी मुखर्जीचा 'मर्दानी ३' बॉक्स ऑफिसवर पास की नापास? रविवारी कमावले 'इतके' कोटी; जाणून घ्या एकूण कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:41 IST2026-02-02T11:40:18+5:302026-02-02T11:41:53+5:30

राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' चित्रपटाने तीन दिवसांत किती कमाई केली? जाणून घ्या कलेक्शन…

bollywood actress rani mukerji mardaani 3 box office collection day 3 | राणी मुखर्जीचा 'मर्दानी ३' बॉक्स ऑफिसवर पास की नापास? रविवारी कमावले 'इतके' कोटी; जाणून घ्या एकूण कलेक्शन

राणी मुखर्जीचा 'मर्दानी ३' बॉक्स ऑफिसवर पास की नापास? रविवारी कमावले 'इतके' कोटी; जाणून घ्या एकूण कलेक्शन

Mardaani 3 Box Office Collection: अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला  'मर्दानी ३' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अखेर हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.गेल्या काही वर्षात राणीच्या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मर्दानी ३ कडे सिनेरसिक मोठ्या आशेने  पाहत होते. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यावर भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. एकंदरीत राणी मुखर्जीचा लूक, सिनेमाची पहिली झलक, विषय यामुळं सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ३० जानेवारीला हा सिनेमा रिलीज झाला. दरम्यान, आतापर्यंत या सिनेमाने किती कमाई केली जाणून घेऊया...

यश राज फिल्म्सची हिट फ्रँचायझी असलेल्या'मर्दानी'चा तिसरा भाग देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या बॉर्डर-२ चा दबदबा असल्यामुळे या चित्रपटासमोर 'मर्दानी ३' ला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी राणी मुखर्जीच्या चित्रपटाची चांगली कमाई केली.मात्र,त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आलेख घसरताना दिसला. 'मर्दानी ३'ने पहिल्याच दिवशी ४ कोटी रुपये नेट कमावले आहेत.तर दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ६.२५ कोटींचा गल्ला जमवला. काल रविवार असल्यामुळे  याचा फायदा हा सिनेमाला किती मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आता मर्दानी ३ सिनेमाच्या तिसऱ्या दिवसाचं कलेक्शन देखील समोर आलं आहे. 

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने राणी मुखर्जीच्या 'मर्दानी-३' ने तिसऱ्या दिवशी ७.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण १७.५० कोटी इतकं कलेक्शन केलं आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहणं महत्वाचं आहे. 

'मर्दानी ३' हा अॅक्शन-क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये राणी मुखर्जी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. शिवानी शिवाजी रॉय असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. 

Web Title : रानी मुखर्जी की 'मर्दानी 3': बॉक्स ऑफिस पर हिट या फ्लॉप?

Web Summary : रानी मुखर्जी की 'मर्दानी 3' बॉक्स ऑफिस पर संघर्ष कर रही है। शुरुआती अच्छी कमाई के बाद, कलेक्शन में गिरावट आई, लेकिन रविवार को ₹7.25 करोड़ की कमाई हुई, कुल ₹17.50 करोड़। फिल्म में मुखर्जी पुलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय के रूप में हैं।

Web Title : Rani Mukerji's 'Mardaani 3': Box Office Success or Failure?

Web Summary : Rani Mukerji's 'Mardaani 3' faces box office competition. Opening strong, collections dipped before rising Sunday to ₹7.25 crore, totaling ₹17.50 crore. The action-crime thriller sees Mukerji as Shivani Shivaji Roy, a police officer.