नेहा धुपियाची फॅट-टू-फिट जर्नी! 'या' एका साध्या ट्रिकने केली कमाल, दिसू लागली स्लीम-ट्रीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:44 IST2025-09-29T18:37:40+5:302025-09-29T18:44:59+5:30
नेहा धुपिया पिते खास ड्रिंक, सोपा घरगुती उपाय, वजन होईल झर्रकन कमी

नेहा धुपियाची फॅट-टू-फिट जर्नी! 'या' एका साध्या ट्रिकने केली कमाल, दिसू लागली स्लीम-ट्रीम
Neha Dhupia : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नेहा धुपिया. मॉडलिंपासून करिअरला सुरुवात करणाऱ्या नेहाने आज बॉलिवूडमध्ये एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. नेहा धुपिया तिच्या अभिनयासह फिटनेसनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. वयाची चाळीशी ओलांडूनही ती तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्रीने खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना फिटनेस टिप्स दिल्या आहेत.
अलिकडेच तिने तिच्या चाहत्यांसोबत एक खास ड्रिंक बनवण्याची पद्धत तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओद्वारे तिने चाहत्यांना चॅलेंज देखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर नेहाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.व्यायाम, जीम आणि खाण्यापिण्यासह आहारात तिने आणखी एक महत्त्वाची गोष्ट नियमितपणे केली ती म्हणजे हे खास ड्रिंक.आहारतज्ज्ञ रिचा गंगानी यांनी तिला २१ दिवस दररोज हळद-अदरक, काळी मिरी आणि कलौंजीचं पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. हे ड्रिंक प्यायल्याने चयापचय चांगले होऊन चरबी वेगाने जळू लागते. अशी माहिती अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये असा दावा केला आहे की २१ दिवस सतत हे ड्रिंक प्यायल्याने शरीरातील अंतर्गत सूज देखील कमी होण्यास मदत होईल. नेहाने म्हटलं आहे की ती स्वतः सुद्धा देखील हे चॅलेंज स्विकारलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने काढा बनवण्यासाठी लागणारे घटक आणि इतरही माहिती शेअर केली आहे.