बाबो! ४१० रुपयांचे गुलाबजाम अन् कांदा भजी तब्बल...; अभिनेत्रीच्या रेस्टॉरंटमधील पदार्थांच्या किंमती जाणून बसेल शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:24 IST2025-10-28T11:12:12+5:302025-10-28T11:24:50+5:30
४१० रुपयांचे गुलाबजाम अन् कांदा भजी तब्बल...; अभिनेत्रीच्या रेस्टॉरंटमधील पदार्थांच्या किंमती जाणून बसेल शॉक

बाबो! ४१० रुपयांचे गुलाबजाम अन् कांदा भजी तब्बल...; अभिनेत्रीच्या रेस्टॉरंटमधील पदार्थांच्या किंमती जाणून बसेल शॉक
Mouni Roy: हल्लीच्या काळात अनेक कलाकार अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत व्यवसाय करत आहेत.मराठीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी स्वत चा व्यवसाय सुरु केला आहे. या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय. महादेव आणि नागिन यांसारख्या टीव्ही मालिकांमुळे लोकप्रियतेचं शिखर गाठणारी मौनी रॉयचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
मौनी रॉयने रेस्टॉरंट व्यवसायात पाऊल ठेवल्यापासून तिच्या 'बदमाश' या हॉटेलची चर्चा सुरू आहे. हे रेस्टॉरंट मुंबई आणि बंगळूरमध्ये असून, तेथील आलिशान डेकॉर आणि फ्युजन इंडियन फूडमुळे ते चर्चेत आहे. सध्या मौनीच्या या रेस्टॉरंटबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा आहे. याचं कारण म्हणजे तेथील पदार्थांच्या किंमती ठरल्या आहेत. आता या रेस्टॉरंटमधील काही पदार्थांच्या किमती समोर आल्या असून, त्या पाहून चाहत्यांना भुवया उंचावल्या आहेत. ज्यामध्ये काही पदार्थांची किंमत ३०० ते ८०० रुपयांच्या रेंजमध्ये आहे. या किंमती पाहून अभिनेत्रीचे चाहत्यांना धक्का बसला आहे. मौनी रॉयचं अंधेरी स्थित रेस्टॉरंट जंगल थीमवर आधारित आहे. रेस्टॉरंटमधील मेन्यूमध्ये मसाला पिनट्स ३०० रुपयांना, मसाला पापड, कुरकुरीत कॉर्न आणि शेव पुरीची किंमत ₹२९५ आहे. कांदा भजीची किंमत ३५५ रुपये आहे. तिच्या रेस्टॉरंटचे मुख्य आकर्षण म्हणजे अॅव्होकाडो भेळ, ज्याची किंमत ३९५ आहे.
मौनी रॉयने 'बदमाश' रेस्टॉरंट सुरू करण्यामागची प्रेरणा कशी मिळाली. याबद्दल एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, "मला भारतीय जेवण खूप आवडते. मी जेव्हा कामासाठी प्रवास करते, तेव्हा सगळीकडे इंडियन रेस्टॉरंट्स शोधत असते." असं अभिनेत्रीने सांगितलं होतं.