"मी माझं दुसरं बाळ गमावलं…",राणी मुखर्जीचा गर्भपाताबद्दल खुलासा, म्हणाली-"मनातील दु:ख..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:13 IST2026-01-30T10:11:16+5:302026-01-30T10:13:46+5:30
राणी मुखर्जी दुसऱ्यांदा आई होणार होती, पण गर्भपात झाला अन्...; सांगितला ‘तो’ दु:खद अनुभव

"मी माझं दुसरं बाळ गमावलं…",राणी मुखर्जीचा गर्भपाताबद्दल खुलासा, म्हणाली-"मनातील दु:ख..."
Rani Mukerjee Talk About Misscariage: ९० च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे राणी मुखर्जी. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने चाहत्यांना आपलंसं केलं. आता लवकरच राणी मुखर्जी मर्दानी ३ या तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या दु:खद प्रसंगाविषयी सांगितलं आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं बोलणं टाळते. खूप कमी वेळा ती आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत असते. अभिनेत्रीने अलिकडेच पिंकव्हिलासोबत संवाद साधताना तिच्या गर्भपाताबद्दल खुलासा केला. राणीने उघडपणे सांगितलं की जेव्हा ती तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात होती, तेव्हा तिला 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून तिला या दुःखातून बाहेर पडण्यास खूप मदत झाली, असंही तिने सांगितलं. तो दु:खद अनुभव शेअर करत राणी म्हणाली,"ती भूमिका माझ्याकडे अशा वेळी आली जेव्हा मी माझं दुसरं मूल गमावलं होतं. त्यावेळी एकटेपणा आणि माझ्या मनातील दु:ख खूप मोठं वाटत होतं."
मग पुढे अभिनेत्री मिस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे सिनेमाबद्दल म्हणाली, "या चित्रपटाची कथा ऐकताच मी त्याच्याशी पूर्णपणे जोडले गेले आणि मी ठरवलं की मला ही कथा जगाला सांगायची आहे.मला पडद्यावर दाखवायचे होतं, जेव्हा कोणीतरी एका आईच्या डोळ्यासमोर तिच्या मुलांना हिसकावून घेतं, तेव्हा त्या आईची काय अवस्था होते. तिला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं. यामुळे त्या निष्पाप मुलांवर त्याचा काय परिणाम होतो हे लोकांना कळणं खूप महत्वाचं होतं." राणी पुढे म्हणाली की, या चित्रपटाद्वारे तिला समाजातील एक कटू वास्तवही समोर आणायचं होतं.
दरम्यान, राणी मुखर्जीने प्रसिद्ध चित्रपट निर्माते आदित्या चोप्रा यांच्याशी एका खासगी समारंभात लग्न केलं. त्यांना आदिरा नावाची एक मुलगी देखील आहे.