"लग्न केलंस तर जाड होशील काम मिळणार नाही...", बॉलिवूड अभिनेत्रीला निर्मात्याने दिलेला अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:12 IST2025-08-07T16:10:01+5:302025-08-07T16:12:01+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीतील 'तो' अनुभव, म्हणाली...

"लग्न केलंस तर जाड होशील काम मिळणार नाही...", बॉलिवूड अभिनेत्रीला निर्मात्याने दिलेला अजब सल्ला
Mansi Parekh: अभिनय क्षेत्रात काम करताना कलाकारांना बऱ्याचदा चांगले वाईट अनुभव येत असतात. याबद्दल आता कलाकार पुढे येऊन बोलताना दिसतात. अशातच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने तिला कामाच्या ठिकाणी आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं आहे. या अभिनेत्रीचं नाव मानसी पारेख आहे.
'सुमित संभाल लेगा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मानसी पारेख. टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूड असा मोठा पल्ला तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर गाठला आहे. सध्या मानसी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिला सुंदर नसल्यामुळे नकार देण्यात आला होता, असा खुलासा केला. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "मला अनेकदा असं म्हटलं गेलं की तू सुंदर दिसत नाहीस. तुला लीड रोलमध्ये कोणीच देणार नाही."
त्यानंतर मानसी म्हणाली, "जेव्हा माझं लग्न ठरलं होतं. त्यावेळी एका निर्मात्याने म्हटलं होतं, लग्न करून नकोस जाड होशील. पण, आज मी कोणत्या ठिकाणी येऊन पोहोचले आहे, हे सगळेच पाहात आहेत. मला इंडस्ट्रीत काम करुन २० वर्ष झाली आहेत. शिवाय मी एक आई देखील आहे, असं असूनही काम करतेच आहे. मी तेव्हा ठामपणे विचार केला होत की, मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन. खरं सांगायचं तर, माझं करिअर हे लग्नानंतरच घडलं. मी आई झाले आणि त्यानंतक करिअरला कलाटणी मिळाली." असा अनुभव अभिनेत्रीने शेअर केला.
मानसी पारेखने 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक', 'कच्छ एक्सप्रेस' अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. कच्छ एक्सप्रेसमधील तिच्या कामासाठी अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कार मिळाला आहे.