थकवा, तणाव अन्...; अचानक उफाळून आली वेगळीच लक्षणं! लोकप्रिय अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:30 IST2025-10-01T11:17:34+5:302025-10-01T11:30:37+5:30
लोकप्रिय अभिनेत्री रुग्णालयात दाखल, अवस्था पाहून चाहते चिंतेत, म्हणाली-" शेवटचा हृदयाचा ठोका..."

थकवा, तणाव अन्...; अचानक उफाळून आली वेगळीच लक्षणं! लोकप्रिय अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत
Mandana Karimi: ईराणी अभिनेत्री,मॉडेल मंदाना करीमी ही मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'क्या कूल है हम', 'भाग जॉनी', 'रॉय' तसेच 'बिग बॉस हिंदी' या शोमधून मंदाना करीमी हे प्रसिद्धीझोतात आलं. चित्रपटांमधील मादक दृश्यांमुळे ती जास्त चर्चेत असते.मंदाना करीमी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मिडिया पोस्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील येते. अशातच नुकतीच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून तिचे चाहते देखील चिंतेत आहेत. थकवा,डिहायड्रेशन आणि तणावामुळे मंदानाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.
मंदाना करीमीने इन्स्टाग्रामवर तिचे रुग्णालयाती फोटो शेअर करत म्हटलंय की, "गेल्या
अनेक महिन्यांपासून फ्लाईटने प्रवास, इतर कार्यक्रम, रात्री उशिरा मिटींग्स आणि कामाची डेडलाइन या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिच्या आरोग्यावर झाल्याचं तिने सांगितलंय. माझ्यातल्या बॉस लेडीची एनर्जी एकदम जबरदस्त होती.पण, अलिकडेच माझी तब्ब्येत अचानक बिघडली. त्यामुळे असं वाटत होतं की,कदाचित हा माझा शेवटचा हृदयाचा ठोका आहे. थकवा, डिहायड्रेशन आणि ताणवामुळे अशी परिस्थिती माझ्यावर ओढावली. पण, हा अनुभव माझ्यासाठी भयानक होता. "
त्याचबरोबर पुढे अभिनेत्रीने म्हटलंय, "बऱ्याच टेस्ट आणि चेक-अपनंतर आता तिच्या तब्ब्येतीत थोडी सुधारणा आहे. स्वतःच्या शरीराची काळजी न घेतल्यामुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिची प्रकृती बिघडली, असंही तिने या पोस्टद्वारे सांगितलं. याशिवाय मंदानाने चाहत्यांना मेसेजही शेअर केला आहे. तुमच्या शरीराची खरी ताकद फक्त सतत कठोर परिश्रम करून वाढत नाहीतर वेळोवेळी थांबणं देखील गरजेचं आहे." यापुढे आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ असा निश्चयही तिने केला आहे.