पहिलं लग्न मोडलं, पदरात १८ वर्षांची मुलगी; आता ५२ व्या वर्षी 'ही' अभिनेत्री लग्नासाठी तयार, म्हणाली-"आयुष्यात आधार..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:10 IST2025-12-16T10:08:27+5:302025-12-16T10:10:46+5:30
लग्नाआधी गरोदर होती अभिनेत्री! घटस्फोटित पुरुषाच्या प्रेमात अडकली अन् फसली, आता थाटायचाय दुसऱ्यांदा संसार; म्हणाली...

पहिलं लग्न मोडलं, पदरात १८ वर्षांची मुलगी; आता ५२ व्या वर्षी 'ही' अभिनेत्री लग्नासाठी तयार, म्हणाली-"आयुष्यात आधार..."
Mahima Chaudhary: ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांचे हृदय जिंकणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. महिमाने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत 'परदेस','धडकन','सौतन', 'सॅंडविच', 'डार्क चॉकलेट' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र,ही नायिका तिच्या करिअरमध्ये चित्रपटांपेक्षा पर्सनल लाइफमुळे सर्वाधिक चर्चेत राहिली.महिमा चौधरी सध्या 'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' या चित्रपटामुळे चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. या चित्रपटात महिमा संजय मिश्रा यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिकेत पाहायला मिळतेय.त्यात आता एका मुलाखतीत महिमाने दुसऱ्या लग्नाबद्दल तिचं मत व्यक्त केलंय. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
महिमाला १८ वर्षांची मुलगी आहे.यशाच्या शिखरावर असताना ३३ व्या वर्षी महिमाने आर्किटेक बार्बी मुखर्जीसोबत लग्न केलं आणि ती इंडस्ट्रीपासून दुरावली.लग्नाआधीच गरोदर राहिल्याने अभिनेत्रीने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर लग्नाच्या ७ वर्षांतच या दोघांनीही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. या मुलाखतीत ती म्हणाली,“माझा कायदेशीररित्या घटस्फोट अजूनही झालेला नाही. परंतु, मी पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहे.आता मी दुसऱ्या लग्नाबद्दल विचार करत आहे.
त्यानंतर मग पुढे अभिनेत्रीने म्हणाली,‘दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी’ या चित्रपटामधील माझा लूक व्हायरल झाला तेव्हापासून, मी पुन्हा लग्न करावं,असं लोकांना वाटतंय. पण मी हार मानणारी नाही. माझा अजूनही लग्नसंस्थेवर विश्वास आहे. मला वाटतं की दोन लोक एकत्र येऊन आयुष्य आनंदाने जगू शकतात. कारण आपल्याला आयुष्यात कायम एका आधाराची गरज असते." असं मत महिमा चौधरीने मांडलं.
लग्नाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली...
यानंतर लग्नाबद्दल अभिनेत्रीने म्हटलं की, "लग्नाबद्दल माझ्या मनात कोणतीही कटूता नाही. त्यामुळे लग्न हे गरजेच आहे. कारण, तुम्ही एकट्याने मुलांचं संगोपन करणं सोपं नसतं. सध्याच्या काळात ज्वाईंट फॅमिलीचा कोणताही पाठिंबा नसतो. सर्वात जास्त समस्या तेव्हा येतात जेव्हा एक व्यक्ती आधुनिक असते आणि दुसरी रूढीवादी असते.त्यामुळे लग्नासाठी एकमेकांमध्ये समजूतदारपणा असणं आवश्यक असतं."