अभिनेत्री लारा दत्ताला पितृशोक; वडील वायुसेनेत होते कार्यरत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:36 IST2025-05-31T17:34:28+5:302025-05-31T17:36:59+5:30

LK Dutaa Death: अभिनेत्री लारा दत्ताला पितृशोक; वडील वायुसेनेत होते कार्यरत 

bollywood actress lara dutta father wing commander lk dutta passes away  | अभिनेत्री लारा दत्ताला पितृशोक; वडील वायुसेनेत होते कार्यरत 

अभिनेत्री लारा दत्ताला पितृशोक; वडील वायुसेनेत होते कार्यरत 

Lara Dutaa Father Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. लाराचे वडील विंग कमांडर एल.के दत्ता यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्री तिच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पती महेश भूपतीसोबत मुंबईत आली . लारा दत्ताच्या वडिलांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं . परंतु त्यांनी या आजारावर यशस्वीरित्या मात केली होती. दरम्यान, लारा दत्ताच्या वडिलांच्या निधनाची माहिती समोर येताच तिचे चाहते शोक व्यक्त करत आहेत.

लाराचे वडील हवाई दलातील निवृत्त विंग कमांडर होते. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप कळलेलं नाही. आज ३१ मे रोजी मुंबईतील सांताक्रूझ येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांच्या निधनाने अभिनेत्रीच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. 

लारा दत्ताचं तिच्या वडिलांबरोबर जवळचं नातं होतं. अनेकदा ती सोशल मीडियावर त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायची. अलिकडेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने वडिलांबरोबरच खास पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केली होती. अभिनेत्री लारा दत्ताच्या करिअरमध्ये वडिलांचा मोठा हात होता.

Web Title: bollywood actress lara dutta father wing commander lk dutta passes away