कियारा अडवाणी होणार आई; सोशल मीडियावर फोटो शेअर करत कपलने चाहत्यांना दिली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:18 IST2025-02-28T14:16:25+5:302025-02-28T14:18:41+5:30
Kiara Advani Announce Pregnancy: आलिया, दीपिकानंतर बी-टाऊनमधील 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होणार आई; लग्नाच्या दोन वर्षानंतर घरी हलणार पाळणा

कियारा अडवाणी होणार आई; सोशल मीडियावर फोटो शेअर करत कपलने चाहत्यांना दिली गुडन्यूज
Kiara Advani And Siddharth Malhotra: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये सिद्धार्थ-कियारा लग्नबंधनात अडकले. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर त्यांचा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला पडला. त्यानंतर आता लग्नाच्या दोन वर्षानंतर सिद्धार्थ-कियारा आई-बाबा होणार आहेत. नुकतीच सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
नुकतीच सोशल मीडियावर सिद्धार्थ-कियाराने खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सिद्धार्थ-कियाराने हातात लहान बाळाचे शूज घेऊन छानसं फोटोशूट केलं आहे. हा सुंदर फोटो इनस्टाग्रामवर शेअर करत लवकरच ते आपल्या बाळाचं स्वागत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. "आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट..., लवकरच येत आहे...", अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे त्यांचे सगळे चाहते तसेच मनोरंजनविश्वातून या कपलला त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
दरम्यान, कियारा अडवाणीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अलिकडेच 'गेम चेंजर' या सिनेमात दिसली होती. या चित्रपटात तिने साऊथ स्टार राम चरणसोबत स्क्रीन शेअर केली होती. तर सिद्धार्थ मल्होत्रा 'परम सुंदरी' या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.