हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये करिष्मानं दिलं लेक्चर, नेटकऱ्यांनी घेतली शाळा म्हणाले, 'हद कर दी...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 14:40 IST2024-02-27T14:37:39+5:302024-02-27T14:40:08+5:30
९० च्या दशकात हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर.

हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये करिष्मानं दिलं लेक्चर, नेटकऱ्यांनी घेतली शाळा म्हणाले, 'हद कर दी...'
Karishma Kapoor : ९० च्या दशकात हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री करिष्मा कपूरने सध्या रुपेरी पडद्यापासून लांब राहणं पसंत केलंय. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवत तिने लाखो चाहत्यांची मनं जिंकली. एक काळ असा होता जेव्हा तिच्यासोबत काम करण्यासाठी बॉलिवूडचे नामांकित अभिनेते देखील उत्सुक असायचे.
सध्या बॉलिवूडची 'लोलो' एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आली आहे. अमेरिकेच्या मैसाचुसेट्स येथील हार्वर्ड बिझनेस स्कुलमध्ये इंडिया कॉन्फरन्समध्ये भाषण देण्याचा मान तिला मिळाला. जगप्रसिद्ध विद्यापीठात वक्ता म्हणून जाणं ही गोष्ट माझ्यासाठी सन्मानजनक आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली.
आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने माहिती दिली आहे. या कॉन्फरन्स मध्ये करिष्माने अभिनेत्री करीना कपूरला व्हिडीओ कॉलद्वारे सामील केलं होतं. या निमित्ताने तिने बॉलिवूडमधील तिच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. हार्वर्ड येथील इंडिया कॉन्फरन्समध्ये वक्ता होण्याचा मान मिळाल्यानं आपण आनंदी असल्याचं ती म्हणते. एका उत्स्फूर्त पण उद्बोधक संभाषणासाठी आमच्यात सामील झाल्याबद्दल @KareenaKapoorKhan चे आभार, असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलंय.
अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंवर काही नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. तर काही जणांनी तिला ट्रोलही केलं आहे. तर अनेकांनी तिच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर देखील प्रश्न उपस्थित केले.