"आता बॉलिवूडमध्ये ती मजाच उरली नाही...", करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, 'धुरंधर'चा उल्लेख करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 10:58 IST2026-03-09T10:56:16+5:302026-03-09T10:58:36+5:30

"आता सिनेमांमध्ये पूर्वीसारखी मजा नाही...", इंडस्ट्रीतील बदलत्या ट्रेंडवर करीना कपूरची जाहीररित्या नाराजी, म्हणाली...

bollywood actress kareena kapoor expressed her opinion on hyper masculine films | "आता बॉलिवूडमध्ये ती मजाच उरली नाही...", करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, 'धुरंधर'चा उल्लेख करत म्हणाली...

"आता बॉलिवूडमध्ये ती मजाच उरली नाही...", करीना कपूरचं वक्तव्य चर्चेत, 'धुरंधर'चा उल्लेख करत म्हणाली...

Kareena Kapoor: बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर ही सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका आहे. आपल्या अनोख्या स्टाईलने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. साल २००० मध्ये जेपी दत्ता दिग्दर्शित रिफ्यूजी या चित्रपटातून करीनाने तिच्या कारकि‍र्दीची सुरुवात केली. करीनाने तिच्या आजवरच्या कारकि‍र्दीत अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. करीना ही इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या नेहमी ठामपणे त्यांची मतं, प्रतिक्रिया देत असतात. आपलं खासगी आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य असो करीन नेहमी मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसते. 

सध्या अभिनेत्री करीना कपूर एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आताच्या काळातील चित्रपटांचे आशय आणि ट्रेंडवर भाष्य केलं आहे. सध्याच्या अनेक चित्रपटांमध्ये पूर्वी असलेली मजा ती गाणी आणि रोमान्सचा अभाव आहे, अशी स्पष्ट शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली. अलिकडेच हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत करीना  म्हणाली,  सध्याच्या काळातील चित्रपटांमध्ये  थ्रिलर, गुन्हेगारी आणि रक्तपात दाखवणं या सगळ्या गोष्टींवर अधिक भर दिला जात आहे. अशा चित्रपटांमध्ये पूर्वीप्रमाणे मनोरंजन ती ऊर्जा आणि ती रंगत नाही. शिवाय  रोमॅंन्टिक भावनांचा अभाव जाणवतो.याच गोष्टी एकेकाळी बॉलिवूडची ओळख होत्या."

त्यानंतर अभिनेत्री म्हणाली,"चित्रपट केवळ अॅक्शन आणि हिंसाचारापर्यंत मर्यादित नसावेत, तर प्रेम, संगीत आणि भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.त्यामुळे महिलांसाठी सशक्त भूमिका असलेल्या फारशा पटकथा मिळत नाहीत." असं ठाम मत तिने या मुलाखतीत मांडलं. 

वर्कफ्रंट 

करीना कपूरच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, करीना कपूर लवकरच दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या 'दायरा' या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title : करीना कपूर ने कहा, बॉलीवुड का आकर्षण खो गया है।

Web Summary : करीना कपूर को लगता है कि मौजूदा फिल्मों में वह आकर्षण, रोमांस और संगीत नहीं है जो बॉलीवुड को परिभाषित करता था। उन्होंने एक्शन के साथ प्यार और भावनाओं की आवश्यकता पर जोर दिया, और मजबूत महिला भूमिकाओं की कमी पर अफसोस जताया।

Web Title : Bollywood lost its charm, says Kareena Kapoor in discussion.

Web Summary : Kareena Kapoor feels current films lack the charm, romance, and music that defined Bollywood. She emphasizes the need for love and emotions alongside action, lamenting fewer strong female roles.