"लोकांची मानसिकता...", लग्नाआधीच गरोदर होती अभिनेत्री, ऐकावे लागले लोकांचे टोमणे; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:51 IST2025-07-23T11:48:13+5:302025-07-23T11:51:27+5:30
प्रसिद्ध दिग्दर्शसोबत घटस्फोट अन्... लग्नाआधीच गरोदर होती अभिनेत्री, ट्रोल करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

"लोकांची मानसिकता...", लग्नाआधीच गरोदर होती अभिनेत्री, ऐकावे लागले लोकांचे टोमणे; म्हणाली...
Kalki Koechlin: 'ये जवानी है दिवानी', 'देव डी' यांसारख्या चित्रपटातून अभिनेत्री कल्की कोचलीनने (Kalki Koechlin) प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक झालं. पण, ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली. कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर २०११ मध्ये दोघांनीही लग्न केलं. पण हे नाते फार काळ टिकलं नाही. अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. असं वक्तव्यसुद्धा तिने केलं होतं. शिवाय अविवाहित असताना ती गरोदर राहिली होती. असा खुलाला तिने एका मुलाखतीत केला आहे.
नुकताच कल्की कोचलीनने 'झुम'सोबत संवाद साधला. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या मनातील खंत व्यक्त केली. तेव्हा ती म्हणाली, लग्न न करताच आई होणं ही गोष्ट सामान्य वाटत असली तरीही समाजासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा मी गरोदर होते तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं, त्यामुळे ती इतरांसाठी मोठी गोष्ट होती. शिवाय लोक म्हणायचे की लग्न न करताच तू गरोदर आहेस? असले विचित्र प्रश्न मला विचारले जायचे. १८ व्या शतकात असं बोललं जायचं, परंतु आजही लोकांची मानसिकता बदलेली नाही.
पुढे तिने सांगितलं, मला हे काय चाललं समजत नाही. मी आणि माझा पार्टनर आम्ही काही काळ एकत्र राहिलो. त्यानंतर आम्हाला मुल झालं, त्यामुळे मी गरोदर राहणं, या गोष्टी अगदीच नॉर्मल आहेत. मला कधीकधी असं वाटतं की आपण समाजात खोट्या गोष्टींच्या आधारावर जगत आहोत, जिथं आपण कायम असं भासवतो की या गोष्टी घडत नाहीत. आपली लोकसंख्या खूप मोठी आहे, आणि या गोष्टी घडतातच."
कल्की कोचलीन इस्त्रायसली गायक गाय हर्शबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याचदरम्यान अभिनेत्री गर्भवती राहिली. २०२२ मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला आहे.