तमन्नासोबत ब्रेकअप होताच विजय वर्मा 'दंगल गर्ल' ला करतोय डेट? अफेयर्सच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:53 IST2025-06-26T10:49:04+5:302025-06-26T10:53:01+5:30

बॉलिवूडची 'दंगल गर्ल' अशी ओळख असलेल्या फातिमा सना शेखने (Fatima Sana Shaikh) आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

bollywood actress fatima sana shaikh breaks silence on dating rumours with vijay varma | तमन्नासोबत ब्रेकअप होताच विजय वर्मा 'दंगल गर्ल' ला करतोय डेट? अफेयर्सच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन 

तमन्नासोबत ब्रेकअप होताच विजय वर्मा 'दंगल गर्ल' ला करतोय डेट? अफेयर्सच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन 

Fatima Sana Shaikh:बॉलिवूडची 'दंगल गर्ल' अशी ओळख असलेल्या फातिमा सना शेखने (Fatima Sana Shaikh) आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या एकामागोमाग नवनवीन चित्रपटांतून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लवकरच ती 'आप जैसा कोई नहीं' तसेच मेट्रो इन दिनोंच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. दरम्यान,फातिमा आपल्या अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. यादरम्यान अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चाही रंगली आहे. फातिमाचं नाव अभिनेता विजय वर्मासोबत जोडण्यात येत आहे. याच अफवांवर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. 

सध्या फातिमा सना शेख तिचा त्याच्या आगामी 'आप जैसा कोई' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम मुंबईत पार पडला. या इव्हेंटदरम्यान जेव्हा मीडियाने फातिमाला तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी अभिनेत्रीने अफेअर्सच्या अफवांचं खंडण करत ती सिंगल असल्याचं तिने म्हटलं. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, मी सिंगल आहे.  मग पुढे अभिनेत्रीला यशस्वी नात्याबद्दल काय मत आहे, असं विचारण्यात आलं. त्यावर बोलताना ती म्हणाली, 'एक परिपूर्ण नातं ते असतं जिथे दोन लोक एकमेकांचा आदर करतात. एकमेकांना समजून घेता आणि सोबत एकत्र पुढे जाता. अशी भावना अभिनेत्रीने व्यक्त केली. 

त्यानंतर पुढे रिलेशनशिप स्टेटसबद्दल अभिनेत्री म्हणाली, "आजकाल चांगली मुलं कुठेच सापडत नाही. ते फक्त चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं, खऱ्या आयुष्यात नाही. "असं अभिनेत्रीने सांगितलं. 

दरम्यान, विजय वर्मा आणि फातिमा शेख 'गुस्ताख इश्क' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या सिनेमाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शरीब हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील.

Web Title: bollywood actress fatima sana shaikh breaks silence on dating rumours with vijay varma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.