बॉलिवूड गाजवल्यानंतर दिशा पाटनीची हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकासोबत करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:38 IST2025-05-31T14:35:18+5:302025-05-31T14:38:22+5:30
दिशा पाटनीची हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकासोबत करणार काम

बॉलिवूड गाजवल्यानंतर दिशा पाटनीची हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकासोबत करणार काम
Disha Patani Hollywood Debut: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. दिशा तिच्या अभिनयासह हटके फॅशन सेन्समुळे लाईमलाइटमध्ये येते. सध्या मनोरंजनविश्वात अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. याचं कारण म्हणजे लवकरच दिशा पाटनीहॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. दीपिका पादुकोण, आलिया भट्ट तसेच प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता दिशा पाटनीने आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवला आहे. प्रसिद्ध, ऑस्कर विजेते दिग्दर्शक केविन स्पेसी यांच्या चित्रपटात ती झळकणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, बॉलिवूड गाजवल्यानंतर अभिनेत्री दिशा पाटनी आता हॉलिवूडमध्येही पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. दिशा लवकरच 'होलीगार्ड्स' या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दिशा पाटनीसह डॉल्फ लुंडग्रेन, टायरेस गिब्सन आणि ब्रायना हिल्डेब्रँड यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'होलीगार्ड्स' हा चित्रपट 'स्टॅटिगार्ड्स विरुद्ध होलीगार्ड्स' नावाच्या फ्रँचायझीचा एक भाग आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिशा पाटनीचा शूटिंग दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो मेक्सिको मधील होता, जिथे चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं.
वर्कफ्रंट
दिशा पटानीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथ इंडस्ट्रीमधून केली होती. २०१५ मध्ये 'लोफर' या तेलुगू चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर, २०१६ मध्ये त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळाला, 'एम.एस.' 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती. त्याबरोबर दिशाने 'मलंग', 'बागी-२', 'कल्की 2898 ए.डी', 'कंगुवा' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.