"मला मानधनाच्या बाबतीतही...", फक्त ८ तास काम करण्याच्या मागणीवर अखेर दीपिकाने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 09:17 IST2025-10-10T09:11:13+5:302025-10-10T09:17:10+5:30
फक्त ८ तास कामाच्या मुद्द्यावर दीपिका पादुकोणने अखेर सोडलं मौन, म्हणाली- "मी अशी व्यक्ती आहे जी..."

"मला मानधनाच्या बाबतीतही...", फक्त ८ तास काम करण्याच्या मागणीवर अखेर दीपिकाने सोडलं मौन
Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण हे हिंदी सिनेविश्वातील आघाडीची नायिका आहे. 'ओम शांती ओम' सारख्या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण करत दीपिकाने इंडस्ट्रीत स्वत चं स्थान निर्माण केलं आहे. आजवर तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक झालं. 'ओम शांती ओम', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'पिकू', 'ये जवानी है दिवानी', 'हॅप्पी न्यू इयर', 'पठाण' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून दीपिका पादुकोण आछ तासांच्या कामाच्या मागणीमुळे सात्यत्याने चर्चेत येत आहे. अशातच नुकतीच दीपिकाने एका कार्यक्रमात सध्या इंडस्ट्रीत सुरु असलेल्या चर्चांवर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं आठ तासांच्या शिफ्टमध्येच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं. पण तिच्या या मागणीनंतर बॉलिवूडसह मराठी मनोरंजनविश्वातही चर्चा सुरू झाली. त्यात अलिकडेच जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दीपिका पादुकोणने मध्य प्रदेशला भेट दिली. यावेळी त्यांच्या 'Live Love Laugh' या फाउंडेशनच्या दहा वर्षांच्या प्रवासाचा विशेष टप्पा साजरा करण्यात आला. ही संस्था गेल्या दशकभरात भारतात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता आणि समर्थन यासाठी महत्त्वपूर्ण काम करत आहे. याचदरम्यान, दीपिका पादुकोणला प्रश्न विचारण्यात आला की,“तुम्ही जसं न्याय मागता, त्यासाठी कधी तुम्हाला किंमत मोजावी लागली का? या प्रश्नाचं दीपिकाने एका अतिशय विचारपूर्वक आणि प्रगल्भ उत्तराने प्रत्युत्तर दिलं."मी अनेक स्तरांवर काम केलं आहे, हे माझ्यासाठी नवीन नाही. मला अगदी मानधनासारख्या गोष्टींच्या बाबतीतही जे काही अनुभव माझ्या वाट्याला आले त्याला तोंड द्यावं लागलं. याला नक्की काय म्हणावं हे मला माहीत नाही, पण मी अशी व्यक्ती आहे जी नेहमी आपल्या लढाया शांतपणे लढते. शिवाय काही कारणांमुळे कधीकधी तो चर्चेचा विषय बनवला जातो.ज्याबद्दल मला काही कल्पनाही नसते.पण, माझ्या लढाया शांततेत आणि सन्मानानं लढणं, हेच मला योग्य वाटतं."
दीपिकाने यादरम्यान, तिच्या वैयक्तिक प्रवासाचा नव्हे, तर व्यवसायिक आयुष्यातील समानता, न्याय आणि आत्मसन्मान यासारख्या मोठ्या मुद्द्यांचाही वेध घेतला आहे. दीपिका तिच्या स्वभावाला साजेसं काम, पडद्यावर आणि पडद्याच्या बाहेर शांततेने, धैर्याने आणि प्रामाणिकपणे करत राहते, असंही तिने या कार्यक्रमात म्हटलं.
दरम्यान, दीपिका पादुकोणने गरोदर असताना कामातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती संदीप रेडी वांगा यांच्या बहुचर्तित स्पिरिट मधून एक्झिट घेतल्याने तिची सर्वत्र चर्चा झाली. या कार्यक्रमात दीपिकाने दिलेल्या उत्तराने अनेकांची मनं जिंकली आहेत. दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती शाहरुख खानसोबत 'किंग' चित्रपटात दिसणार आहे.