१५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ! बॉलिवूड अभिनेत्रीचं घटस्फोटावर भाष्य, म्हणाली-" मला स्वत:ला वाचवण्यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:31 IST2025-12-19T10:26:44+5:302025-12-19T10:31:47+5:30
१५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ, ऑस्ट्रेलियन उद्योजकाशी लग्न केलं पण फसली;घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री

१५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ! बॉलिवूड अभिनेत्रीचं घटस्फोटावर भाष्य, म्हणाली-" मला स्वत:ला वाचवण्यासाठी..."
Celina Jaitley : हिंदी सिनेसृष्टीत येण्याचा राजमार्ग हा सौंदर्य स्पर्धांमधून येतो असं म्हटलं जातं. या अभिनेत्रींमध्ये काही गाजल्या तर काहींच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. त्यातील एक नाव म्हणजे सेलिना जेटली (Celina Jaitley) . अभिनेत्री सेलिना जेटली सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती पीटर हाग (Peter Haag) याच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. तिने या संदर्भात मुंबईतील न्यायालयात धाव घेतली आहे. सेलिना जेटली सध्या कठीण परिस्थितीतून जात आहेत.दरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या वैवाहिक आयु्ष्याबद्दल भाष्य केलं आहे.
२००३ मध्ये आलेल्या जानशीन या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर चित्रपटसृष्टीची दारे तिच्यासाठी खुली झाली. सेलिनाने तिच्या कारकिर्दीत अपना सपना मनी मनी, गोलमाल रिटर्न्स, थॅंक्यू अशा चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीनं तिच्या पतीवर भावनिक आणि शारिरीक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. नुकतीच सेलिनाने 'टाइम्स ऑफ इंडिया' ला मुलाखतीत दिली, त्यावेळी तिने
पहिल्यांदाच आपल्या घटस्फोटाबद्दल त्यापूर्वी सोशल मीडियावर असलेला वावर याबद्दल प्रतिक्रिया दिली. सेलिना म्हणाली,"तुम्ही सोशल मीडियावर जे पाहता, ते सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाचा फक्त एक छोटासा भाग असतात. मी अनेक वर्षांपासून या गोष्टींना सामोरी जात होते. इतर स्त्रियांप्रमाणेच मी सुद्धा माझ्या मुलांसाठी परिस्थिती सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रत्यक्षात ते खूप कठीण होतं."
सेलिना म्हणाली, "मी कायम माझ्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला.मला कोणताही पश्चात्ताप नाही, कारण माझा हेतू नेहमीच चांगला होता.माझ्या आई-वडिलांना गमावल्यानंतर मी घरापासून दूर गेले, स्वतःसाठी उभी राहिली तरीही माझ्या मनात खूप असुरक्षितता होती. मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आधार गमावला होता. त्यामुळे मला माझ्या मुलांना गमावण्याची भीती वाटत होती. माझी आर्थिक परिस्थिती, माझं स्वातंत्र्य आणि माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची होती ती माझी मुलं. त्यांना एक चांगलं आयु्ष्य देण्याची जबाबदारी माझी होती. पण स्वतःला वाचवण्याचा विचार करण्यापूर्वी, मला हे सगळं वाचवायचं होतं."
काय घडलेलं?
सेलिना ११ ऑक्टोबर रोजी तिच्या मुलांना सोडून भारतात परतली. पतीने तिला मध्यरात्री ऑस्ट्रियातील घर सोडण्यास भाग पाडलं होतं, असंही तिने सांगितलं.तसंच पीटर हाग तिच्या तिन्ही मुलांना भेटू देत नसल्याचा आरोपही सेलिनाने केला आहे.
दरम्यान,सेलिना जेटली आणि पती पीटर हाग यांची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना ओळखू लागले.या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं नंतर प्रेम आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.२०१० मध्ये सेलिना-पीटकर विवाहबंधनात अडकले. त्यानंतर २०१२ मध्ये तिला जुळं झालं. मग २०१७ मध्ये सेलिनाने पु्न्हा जुळ्या मुलांना जन्म दिला. दुर्दैवाने त्यातील एकाचं निधन झालं.