प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आयेशा जुल्काने का घेतला इंडस्ट्रीतून ब्रेक? अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:57 IST2025-04-03T11:56:29+5:302025-04-03T11:57:56+5:30

आयेशा जुल्का (Ayesha Jhulka) ही नाव ९० च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे.

bollywood actress ayesha jhulka talk about why she take a break from the industry while at the peak of her career | प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आयेशा जुल्काने का घेतला इंडस्ट्रीतून ब्रेक? अभिनेत्री म्हणाली...

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आयेशा जुल्काने का घेतला इंडस्ट्रीतून ब्रेक? अभिनेत्री म्हणाली...

Ayesha Jhulka : आयेशा जुल्का (Ayesha Jhulka) ही नाव ९० च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या करिअरमध्ये आयशा जुल्काने ‘मुकद्दर का सिकंदर’,'खिलाडी' आणि 'जो जीता वही सिंकदर' या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने अक्षय कुमार, सलमान खान यांच्यासोबतही अनेक चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. पण, अभिनेत्री तिच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच तिने २००३ साली बिझनेसमॅन समीर वाशीशी लग्न केलं आणि त्यानंतर ती इंडस्ट्रीपासून दूर राहिली. तिच्या निर्णायाबद्दल पहिल्यांदाच अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. 

नुकतीच आयेशाा जुल्काने 'हिंदी रश' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. "खरं सांगायचं झालं तर मी इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचं कारण म्हणजे मी खूप जास्त काम करत होते. त्यामुळे त्याचा माझ्या मानसिक आणि शारिरिक आरोग्यावर परिणाम झाला आणि दुसरं कारण म्हणजे एकसारख्याच भूमिका मला ऑफर करण्यात येत होत्या. त्याच भूमिका करून मला समाधान मिळत नव्हतं."

यापुढे अभिनेत्री म्हणाली, "तो एक काळ असतो जेव्हा तुमचं काम, वय आणि समजूतदारपणा या गोष्टीमध्ये फरक जाणवतो. तेव्हा माझी एक ओळख बनली होती, 'गर्ल लाइक नेक्स्ट डोअर', 'चुलबुली' गाणे करणारी त्याला ब्रेक करण्यासाठी मी कोणाला जाऊन सांगितलं की, मला असं काम करायचं आहे तर त्याने काहीच फरक पडला नसता. त्यामुळे मी ब्रेक घेतला कारण मला आयुष्यात आणखी काही गोष्टी करायच्या होत्या. ज्या मी केल्या नव्हत्या. कारण मी खूप व्यस्त असायचे." असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

अलिकडेच आयशा जुल्का २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जीनियस' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं होतं. 

Web Title: bollywood actress ayesha jhulka talk about why she take a break from the industry while at the peak of her career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.