दुबईत स्कायडायव्हिंगच्या नावाखाली गंडवलं! अभिनेत्री अर्चना पूरण सिंगची फसवणूक, 'ती' गोष्ट पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:20 IST2025-07-16T11:18:08+5:302025-07-16T11:20:15+5:30
"आमचे पैसे गेले..." दुबईत स्कायडायव्हिंगच्या नावाखाली अर्चना पूरण सिंगला हजारो रुपयांना घातला गंडा; काय आहे प्रकरण?

दुबईत स्कायडायव्हिंगच्या नावाखाली गंडवलं! अभिनेत्री अर्चना पूरण सिंगची फसवणूक, 'ती' गोष्ट पडली महागात
Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. टीव्ही शोज आणि चित्रपटांव्यतिरिक्त, अर्चना पूरण सिंग तिच्या व्लॉग्समुळेही अनेकदा चर्चेत येते. सध्या अभिनेत्री तिच्या कुटुंबीयांसमवेत दुबईत व्हेकेशनसाठी गेली आहे. परंतु, त्यामध्ये दुबईमध्ये स्कायडायव्हिंगच्या नावाखाली तिची मोठी फसवणूक झाल्याचं तिने म्हटलं आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये दिलखुलास हसणारी आणि सर्वांना खळखळून अर्चना पूरण सिंग सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच अर्चना पूरण सिंगने व्लॉग शेअर केला आहे, या व्लॉगमध्ये तिची मुलं आणि पती आयुष्मान सेठी देखील पाहायला मिळतोय. याचदरम्यान जेव्हा अर्चना तिच्या कुटुंबासह राईडचा आनंद घेण्यासाठी आयफ्लाय दुबईला पोहोचली तेव्हा कंपनीच्या डेस्कवरील व्यक्तीने तिला सांगितलं की तिच्या नावावर कोणतंही बुकिंग नाही. ऑनलाईन तिकिटं बुक करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे.
दरम्यान, अर्चना पुरण सिंगने तिच्या व्लॉगमध्ये म्हटलंय की, 'आम्ही आयफ्लाय दुबईवर तीन स्लॉट बुक केले होते पण इथली महिला कर्मचारी आम्हाला सांगते आहे की आमचं कोणतंही बुकिंग नाही. आमची फसवणूक झाली आहे, कारण आम्ही ज्या वेबसाइटद्वारे बुकिंग आणि पेमेंट केलं ती वेबसाइट त्यांची नाही. आमची फसवणूक झाली आहे. याची तिकिटे देखील स्वस्त नाहीत. आमचे पैसे बुडाले. चक्क दुबईमध्ये आमच्यासोबत असं काही घडेल अशी मला अपेक्षाच नव्हती. इथे इतके कडक नियम आणि कायदे असूनही लोक अशा गोष्टी करायला घाबरतात. मला खूप धक्का बसला आहे, आमचे पैसे वाया गेले."
त्यानंतर अर्चनाचे पती परमीत सेठी म्हणाले," या घटनेनंतर आम्ही तिकिटांचे पैसे रोख दिले. शिवाय आम्हाला कळालं की हा ऑनलाईन स्कॅम झाला आहे." अशी माहिती त्यांनी दिली.