पन्नाशी उलटली तरी अमिषा पटेलने लग्न का केलं नाही? 'त्या' प्रश्नावर अभिनेत्री उत्तर देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:43 IST2025-09-19T11:33:33+5:302025-09-19T11:43:49+5:30

अमिषा पटेलचं लग्नाबद्दल मोठं वक्तव्य, 'या' कारणामुळे आहे सिंगल 

bollywood actress ameesha patel talk about reason for not getting married and single life  | पन्नाशी उलटली तरी अमिषा पटेलने लग्न का केलं नाही? 'त्या' प्रश्नावर अभिनेत्री उत्तर देत म्हणाली...

पन्नाशी उलटली तरी अमिषा पटेलने लग्न का केलं नाही? 'त्या' प्रश्नावर अभिनेत्री उत्तर देत म्हणाली...

Ameeshaa Patel On Marriage:बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत हक्काचं स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. 'गदर' चित्रपटात सकीना साकारून घराघरात पोहोचलेल्या अमिषाने करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडचा एक काळ या अभिनेत्रीने गाजवलाय. 'कहो ना प्यार है', 'गदर', 'ऐतराज' आणि 'हमराज' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.सिनेमांमुळे कायम चर्चेत राहिलेली ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तितकीच चर्चेत राहिली. अमिषा वयाच्या पन्नाशीतही एकाकी जीवन जगते आहे. 

दरम्यान, अलिकडेच एका मुलाखतीत अमिषा पटेलने तिच्या एकाकी जीवनाबद्दल तसंच ती अद्याप अविवाहित असण्याबद्दल  भाष्य केलं आहे. रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये अविवाहित असल्याबद्दल अमिषा म्हणाली, "मी आजपर्यंत कोणाच्याही मागे-मागे गेले नाही. अगदी शाळेत असल्यापासूनच माझे मागे मुलं असायची पण मी अभ्यासाक़डे लक्ष दिलं. तेव्हाही मला खूप  विचारणा झाली आणि आजही होते. पण मी भेटलेल्या अनेक लोकांना मी लग्नानंतर घरीच राहावं आणि काम करू नये अशी इच्छा होती आणि ते मला पटलं नाही. मी माझं बालपण कोणाची तरी मुलगी म्हणून घालवलं. आता तरुणपण कोणाची पत्नी म्हणून असं घालवायचं नाही."

लग्नाबद्दल अमिषा पटेल काय म्हणाली?

"जे लोक तुमच्यावर खरोखर प्रेम करतात ते तुम्हाला कायमच प्रोत्साहन देतील. मी माझ्या करिअरमध्ये खूप काही गमावलं आहे. बऱ्याच वेळा मी एक गोष्ट सोडून दुसरी निवडली आणि दोन्हीकडून लक्षात राहिल असा धडा मिळाला. मी लग्न करायला तयार आहे, फक्त एकच अट आहे की मला योग्य व्यक्ती सापडली पाहिजे. जो व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीशी उभा राहिल, त्याच्याबद्दल मी नक्कीच विचार करेन. आजही मला चांगल्या घरातील मुलांची स्थळं येतात. पण, मी नेहमी करिअरचा विचार केला." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला. 

Web Title: bollywood actress ameesha patel talk about reason for not getting married and single life 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.