देशाचे राष्ट्रपती कोण? आलिया भटने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरी अवाक्; अभिनेत्री झालेली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 14:00 IST2025-01-19T14:00:00+5:302025-01-19T14:00:00+5:30
आलिया भट ही बॉलिवूडमधील आघाडीची नायिका आहे.

देशाचे राष्ट्रपती कोण? आलिया भटने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरी अवाक्; अभिनेत्री झालेली ट्रोल
Alia Bhatt: 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भटने (Alia Bhatt) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकण्यात आलिया यशस्वी ठरली. बॉलिवूडसह हॉलिवूड इंडस्ट्रीतही तिने आपली ओळख निर्माण केली आहे. आलियाने बॉलिवूडला उडता पंजाब, राझी, गंगुबाई काठियावाडी यासारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अलिकडेच अभिनेत्री जिगरा या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. आलिया भट तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. परंतु आलियाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर चित्रपटामुळे नाही तर तिला एका व्हायरल मीम्समुळे चर्चेत आली होती.
२०१३ मध्ये करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आलिया भटने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या रॅपिड फायर राउंडमध्ये अभिनेत्रीला एक प्रश्न विचारण्यात आला, भारताचे राष्ट्रपती कोण? असा तो प्रश्न होता. त्यावेळी अभिनेत्रीने उत्साहाच्या भरात पथ्वीराज चव्हाण यांचं नाव घेतलं होतं, यामुळे आलिया प्रचंड ट्रोल झाली होती. त्यावेळी देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी होते. आलियाच्या उत्तर ऐकून करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्रा लोटपोट हसू लागले.
त्यादरम्यान, आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. शिवाय अभिनेत्रीवर इतके मीम्स बनवले गेले ती परदेशातही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.