"तिच्या डोक्याला दुखापत झाली अन्...", ऐश्वर्यासोबत चित्रपटाच्या सेटवर घडलं भयंकर! बॉबी देओलने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:51 IST2025-10-09T12:37:30+5:302025-10-09T12:51:24+5:30
"तिच्या डोक्याला दुखापत झाली अन्", ऐश्वर्यासोबत 'त्या' चित्रपटाच्या सेटवर घडलं असं काही, बॉबी देओलने सांगितला किस्सा

"तिच्या डोक्याला दुखापत झाली अन्...", ऐश्वर्यासोबत चित्रपटाच्या सेटवर घडलं भयंकर! बॉबी देओलने सांगितला किस्सा
Bollywood News: विश्वसुंदरी, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या अभिनयासह सौंदर्याचे जगभर चाहते आहेत. ऐश्वर्या राय कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अनेकदा तिच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे तिची चर्चा होताना दिसते. 'ताल', 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास' अशा कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. परंतु, ऐश्वर्या राय राहुल रवैल दिग्दर्शित और प्यार हो गया चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली होती. मात्र, त्यादरम्यान, चित्रपटाच्या सेटवर एक घटना घडली होती, ज्यामुळे प्रत्येकजण घाबरला होता. असं काय घडलेलं जाणून घेऊया...
ऐश्वर्या राय आणि बॉबी देओल 'और प्यार हो गया' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी स्वित्झर्लंडमध्ये चित्रपटाचं शूटिंग करताना अभिनेत्रीच्या डोक्याला मार लागला होता. या चित्रपटातील एक सीनसाठी त्यांना हॉट एअर बलूनमध्ये शूट करायचं होतं. पण, ऐन लॅंडिंगवेळी गडबड झाली आणि त्यात ऐश्वर्याच्या डोक्याला दुखापत झाली. तो किस्सा बॉबी देओलने अलिकडेच रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केला.तो किस्सा सांगताना अभिनेता म्हणाला, तो सीन खूपच रोमांचक आणि मजेदार होता. परंतु, अचानक हवेचा वेग वाढला आणि एअर बलून खाली आला. त्यामुळे ऐश्वर्य़ाच्या डोक्याला मार लागला त्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो.
डोक्याला दुखापत झाली असतानाही तिने काम केलं...
पुढे बॉबी देओल ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणाला," डोक्याला लागलेलं असतानाही तिने शूटिंग कॅन्सल न करता पुन्हा कामाला सुरुवात केली. त्याक्षणी सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं. न घाबरता तिने या चित्रपटाचं सगळं शूटिंग पूर्ण केलं. आजवर मी याबाबत कधीही कुठे बोललो नाही, असंही बॉबीने मुलाखतीमध्ये सांगितलं."
बॉबी देओलच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या तो आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये झळकला. या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याशिवाय 'अॅनिमल' चित्रपटात त्याने केलेल्या कामाचं चाहत्यांसह समीक्षकांनीही कौतुक केलं होतं.