वडील मुस्लिम अन् आई हिंदू! बॉलिवूड अभिनेत्याने 'या' मराठी अभिनेत्रीसोबत थाटलाय संसार, लग्नाबद्दल म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:05 IST2025-12-21T16:03:27+5:302025-12-21T16:05:53+5:30
"आमचा बालविवाह झाला...", बॉलिवूड अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत,'या' मराठी अभिनेत्रीसोबत केलाय प्रेमविवाह

वडील मुस्लिम अन् आई हिंदू! बॉलिवूड अभिनेत्याने 'या' मराठी अभिनेत्रीसोबत थाटलाय संसार, लग्नाबद्दल म्हणतो...
Actor Zeeshan Ayyub On Interfaith Marriage: बॉलिवूड अभिनेता मोहम्मद झीशान अय्युब हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय असणारं नाव आहे. अलिकडेच हा अभिनेता 'तेरे इश्क में' या चित्रपटामुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. यातील त्याच्या अभिनयानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मोहम्मद झीशान अय्युब हा त्याच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकाच चर्चेत राहिला आहे. अभिनेत्याने मराठमोळी अभिनेत्री रसिकाआगाशेसोबत २००७ साली लग्नगाठ बांधली. मोहम्मद मुस्लीम आहे तर रसिका हिंदू. त्यामुळे दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. दरम्यान, अलिकडेच एका मुलाखतीत अभिनेत्याने त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल भाष्य केलं आहे.
मोहम्मद झीशान अय्युब आणि राधिका आगाशे यांची लव्हलाईफ कोणापासूनही लपलेली नाही.मोहम्मद आणि रसिका दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र शिकायला होते.त्यानंतर त्यांच्यातील नातं बहरत गेलं. अलिकडेच शुभंकर मिश्राला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीमध्येमोहम्मद झीशान अय्युब त्यांच्या लग्नाविषयी भरभरुन बोलला. त्यावेळी अभिनेत्याने सांगितलं, "एनएसडीमधून पदवीचं शिक्षण पूर्ण करताच आम्ही लग्न केलं.ही माझी पहिली यशस्वी प्रेमकहाणी होती. त्यावेळी मी विचार केला, पहिल्यांदाच एका मुलीने मला होकार दिला आहे. ती मला पूर्णपणे समजून घेण्याआधीच आपण तिच्याशी लग्न करूया."
त्यानंतर झिशान अय्युब त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल विचारण्यात आलं. रसिकासोबत आंतरधर्मीय विवाह केल्याने आणि धार्मिक फरकांमुळे याचा त्यांच्या नात्यावर कधी परिणाम झाला आहे का? त्यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला,"प्रेम सगळ्या गोष्टी सांभाळून घेतं. शिवाय आमच्यासाठी काही गोष्टी कठीण नव्हत्या. सांस्कृतिक फरकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास माझ्यासाठी हे सोपंच होतं. कारण, माझी आई हिंदू ब्राम्हण आहे.लहान असताना आम्ही दिवाळीच्या पूजेत बसायचो आणि आईच्या माहेरी गेल्यानंतर तिकडे शाकाहारी जेवण करायचो. पण,जेव्हा मी माझ्या वडिलांच्या घरी जायचो, तेव्हा आम्ही मांसाहारी जेवण खायचो. त्यामुळे आमच्यासाठी धर्म ही अडचण नव्हती. सांस्कृतिक फरक महत्वाचा होता.पण एक गोष्ट ज्यामुळे आम्ही एकत्र आलो, ती म्हणजे कला.कारण,आम्हा दोघांनाही रंगभूमीची खूप आवड होती."
मग तो म्हणाला, "सगळ्यात आधी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो.त्यावेळी आमच्यात लग्नाबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती.पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आमच्या लक्षात आले की आम्हाला एकमेकांसोबत अधिक वेळ घालवायचा आहे आणि म्हणूनच आम्ही लग्न केलं.ती माझा आधार बनली आहे. आता मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास आणि आयुष्यात मला जे काही करायचं आहे ते करू शकतो. पण,माझ्या मनात एक विचार कायम सुरु असतो तो म्हणजे की ती घरी माझी वाट बघत असेल.यामुळे एक वेगळ्या प्रकारची ताकद मिळते."
नातं कसं टिकून ठेवावं यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता म्हणाला,"प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. मी माझ्या पत्नीसोबत पूर्णपणे कम्पफर्टेबल आहे आणि मला खोटं बोलण्याची गरज नाही. ती माझं सर्वात सुरक्षित ठिकाण आहे."
पत्नी आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री…
रसिकाने 'पेट पुराण', '१ ते ४ बंद', 'भाऊबळी' अशा मराठी कलाकृतींमध्ये अभिनय केला आहे. याशिवाय सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या 'तिचं शहर होणं' सिनेमाचं दिग्दर्शन रसिकाने केलं आहे.