'या' बॉलिवूड खलनायकाला ओळखलंत का ? पत्नीने लावलाय बलात्काराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 09:56 IST2023-03-05T09:54:31+5:302023-03-05T09:56:06+5:30

फोटो बघून तुम्ही अभिनेत्याला ओळखलंत का ? हा सिनेमांमध्ये खलनायकाच्या आणि नायकाच्याही भूमिकेत दिसला आहे

bollywood actor who is currently in limelight due to personal life | 'या' बॉलिवूड खलनायकाला ओळखलंत का ? पत्नीने लावलाय बलात्काराचा आरोप

'या' बॉलिवूड खलनायकाला ओळखलंत का ? पत्नीने लावलाय बलात्काराचा आरोप

बॉलिवूडमध्ये सध्या एक अभिनेता असा आहे जो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. सध्या त्याचा हा लहानपणीचा फोटो व्हायरल होतोय. फोटो बघून तुम्ही अभिनेत्याला ओळखलंत का ? हा सिनेमांमध्ये खलनायकाच्या आणि नायकाच्याही भूमिकेत दिसला आहे. त्याच्या कामाचं नेहमीच कौतुक झालंय. मात्र वैयक्तिक आयुष्यात नुकतेच त्याच्या पत्नीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावलाय.

तर हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आहे. नवाजने 'गॅंग्स ऑफ वासेपूर' सिनेमात खलनायकाची भूमिका उत्तम निभावली होती. तिथूनच तो प्रसिद्धीझोतात आला होता. यानंतर त्याने सलमान खानच्या 'किक' सिनेमातही खलनायक साकारला. तर 'बजरंगी भाईजान'मधील त्याची पत्रकार 'चॉंद नवाब'ची भूमिका चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडली.

मात्र सध्या नवाजच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलंय. आधी पत्नी आणि आईमधील वाद आणि आता त्याची पत्नी आलियाने नवाजवर गंभीर आरोप केले आहेत. तिने नवाजवर बलात्काराचा आरोप केला आहे. तसेच त्याचा भाऊ देखील नवाजवर अनेक आरोप करताना दिसतोय. या सर्व कारणामुळे नवाज चर्चेत आहे. सध्या त्याचं प्रकरण कोर्टात आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याची पत्नी आलियाने व्हिडिओ शेअर करत तिच्या मुलांची काय अवस्था झाली आहे हे दाखवले होते. तर दुसरीकडे नवाजने संपत्तीचा वाद मिटवण्यासाठी गावातील वडिलोपार्जित जमीन भावांच्या नावावर केली.

nawazuddin siddiqui ने मध्यरात्री काढलं पत्नी अन् मुलांना घराबाहेर; Video पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट

नवाजुद्दीन आगामी 'हड्डी' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो ट्रांसजेंडरच्या भूमिकेत आहे. 

Web Title: bollywood actor who is currently in limelight due to personal life