"तिला ३० तास प्रसूती वेदना..." पत्नीचा गरोदरपणातील त्रास बघून घाबरलेला विक्रांत मेस्सी, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:01 IST2025-12-04T13:59:05+5:302025-12-04T14:01:10+5:30
विक्रांत मेस्सीच्या पत्नीची गरोदरपणात झालेली 'अशी' अवस्था, अभिनेता म्हणाला...

"तिला ३० तास प्रसूती वेदना..." पत्नीचा गरोदरपणातील त्रास बघून घाबरलेला विक्रांत मेस्सी, म्हणाला...
Vikrant Massey: टीव्ही इंडस्ट्रीतून सुरुवात करून मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. विक्रांतने 'धरम वीर', 'कुबूल है' तसेच 'बाबा ऐसा वर ढुंढो' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. टीव्ही इंडस्ट्री गाजवल्यानंतर त्याने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. सध्याच्या घडीला विक्रांत इंडस्ट्रतील आघाडीचा अभिनेता आहे. विक्रांत मेस्सी वैयक्तिक आयुष्यात विवाहित आहे. त्याने शीतल ठाकूरसोबत १८ फेब्रुवारी २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला एक गोंडस मुलगा देखील आहे. अशातच अलिकडेच विक्रांतने त्याच्या बाबा होण्याच्या प्रवासावर मोकळेपणाने भाष्य केलं.
अलिकडेच रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये विक्रांतने अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्यादरम्यान, अभिनेत्याने पत्नीच्या गरोदरपणातील कठीण प्रसंगाविषयी सुद्धा सांगितलं. विक्रांत आणि शीतल यांना २०२४ मध्ये पुत्ररत्नाचा लाभ झाला.मात्र, त्याच्या पत्नीला प्रेग्नन्सींदरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मुलगा वरदानच्या जन्मावेळी त्याची पत्नी शीतल जवळपास ३० तास प्रसुती वेदना सहन करत होती, असंही त्याने मुलाखतीत सांगितलं. विक्रांत म्हणाला, लग्न ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतात. मग तो म्हणाला, सुरुवातीला नात्याबद्दल माझ्या मनात संकोच होता. परंतु मला कायमच एक छोटसं कुटुंब असावं असं वाटायचं. म्हणून जेव्हा मला योग्य व्यक्ती सापडली, तेव्हा मला कोणतीही भीती वाटली नाही."
पत्नीच्या गरोदरपणाबद्दल अभिनेता म्हणाला...
त्यानंतर पत्नीच्या प्रेग्नन्सीबद्दल बोलताना विक्रांत म्हणाला," मी शीतलला जवळपास १० वर्षापासून ओळखतो. प्रेग्नंन्सी काळात तिच्या शरीरात होणारे बदल पाहणं हा वेगळा अनुभव होता. मला वाटतं तिला ३० तासांपासून प्रसूती वेदना होत असतील.महिलांना खूप काही सहन करावं लागतं. पुरुष हे सगळं सहन करणं कठीण आहे. "
विक्रांत मेस्सीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तो 'ऑंखों की गुस्ताखियॉं' या सिनेमात पाहायला मिळाला. याशिवाय '१२th फेल', 'द साबरमती रिपोर्ट' यांसारख्या चित्रपटांमध्येही झळकला आहे.