बॅकग्राउंड डान्सर ते अ‍ॅक्शन हिरो; बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्यानं सलमानच्या सिनेमातही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 03:03 PM2024-03-04T15:03:18+5:302024-03-04T15:05:44+5:30

आपल्या धमाकेदार ॲक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या या बॉलिवू़ड अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरूवात एक बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली होती.

bollywood actor vidyut jammwal work as a background dancer in salman khan movie today actor charge 4 crore fees per film | बॅकग्राउंड डान्सर ते अ‍ॅक्शन हिरो; बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्यानं सलमानच्या सिनेमातही केलंय काम

बॅकग्राउंड डान्सर ते अ‍ॅक्शन हिरो; बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्यानं सलमानच्या सिनेमातही केलंय काम

Vidyut Jammwal : आपल्या धमाकेदार ॲक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या या बॉलिवू़ड अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरूवात एक बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली होती. सलमान खानच्या 'दिल ने जिसे अपना कहा' या चित्रपटातून या नायकाने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. हा अभिनेता नेमका आहे तरी कोण जाणून घेऊया...

अभिनेता सलमान खानच्या 'दिल ने जिसे अपना कहा' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा हा अ‍ॅक्टर म्हणजे अभिनेता विद्युत जामवाल. अभिनेता  विद्युत जामवाल हा बॉलिवूडमध्ये त्याच्या धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्ससाठी लोकप्रिय आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता. विद्युतने  बॉलिवूडमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत अभिनेत्याने आपल्या करिअरला सुरुवात केली. .

बॉलिवूडचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ अशी ओळख असलेला विद्युत जामवाल म्हणजे पिळदार शरीरयष्टी आणि दमदार अ‍ॅक्शन भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. केवळ हिंदीच नव्हे, तर विद्युत जामवाल याने तमिळ आणि तेलुगु भाषिक चित्रपटांमध्येही काम करत अनेकांना त्याच्या कामाची दखल घेण्यास भाग पाडलं. 

अलिकडे अभिनेता त्याच्या 'क्रॅक' या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने हिंदी सिनेसृष्टीला बादशाहो, कमांडो, बुलेट राजा, जंगली, खुदा हाफिज, कमांडो ३ असे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. एकेकाळी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करणारा विद्युत त्याच्या एका चित्रपटासाठी ४ कोटी इतकं तगडं मानधन घेतो असं सागितलं जातं. 

Web Title: bollywood actor vidyut jammwal work as a background dancer in salman khan movie today actor charge 4 crore fees per film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.