"अनेकांना वाटलं 'गदर' चालणार नाही, पण...", गाजलेल्या चित्रपटाबद्दल पहिल्यांदाच बोलला सनी देओल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:38 IST2025-08-21T12:33:08+5:302025-08-21T12:38:32+5:30
"इंडस्ट्रीतील लोकांना शंका होत्या, पण...", 'गदर'मध्ये सनी देओलला काम करण्यास झालेला विरोध? काय घडलेलं?

"अनेकांना वाटलं 'गदर' चालणार नाही, पण...", गाजलेल्या चित्रपटाबद्दल पहिल्यांदाच बोलला सनी देओल
Sunny Deol:बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे सनी देओल (Sunny Deol) .सनी देओलने आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, या अभिनेत्याचा 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाने एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे. जवळपास २३ वर्षांपूर्वी आलेल्या सनी देओलच्या (Sunny Deol) चित्रपटाने इतिहास रचला. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील संवाद, गाणी अनेकांच्या ओठांवर आहेत. परंतु, सुरुवातीला अनेकांनी या चित्रपटाबद्दल शंका उपस्थित केली होती. मात्र, सनी देओलने या सगळ्या गोष्टींकडे दूर्लक्ष केलं, हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरला.
पडद्यावर सनी देओल नेहमी ॲक्शन चित्रपट करताना दिसला. प्रत्येक व्यक्तिरेखेत प्रेक्षकांनी त्याला खूप पसंती दिली. नुकत्याच दिलेल्या झुमला दिलेल्या मुलाखतीत त्याने'गदर-एक प्रेम कथा' सिनेमाच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. त्याविषयी बोलताना अभिनेता म्हणाला, "जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा मी ऊटीमध्ये दुसऱ्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. त्यादरम्यान, अनिल शर्मा तिथे आले आणि त्यांनी मला स्क्रिप्ट ऐकवली. त्यावेळी हा प्रोजेक्ट करावा, अशी काही माझी इच्छा नव्हती, कारण मी अनिल शर्मांचे चित्रपट कधीच पाहिले नव्हते. मी फक्त त्यांचे अॅक्शन सीन्स पाहिले होते."
त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला, "जेव्हा मी चित्रपटाची संपू्र्ण स्क्रिप्ट ऐकली तेव्हा ती मला खूपच आवडली. त्यानंतर रात्रभर आम्ही पुन्हा-पुन्हा स्क्रिप्ट ऐकली आणि त्यावर चर्चा करत बसलो होतो. परंतु, हा एक परियड ड्रामा असावा असं माझं मत होतं, त्याच्याशिवाय कथानक इंटरेस्टिंग झालं नसतं. प्रत्येक सिनेमा मी आवडीने करतो कारण त्यासोबत बऱ्याच आठवणी जोडलेल्या असतात. "
इंडस्ट्रीतील लोकांना वाटत होतं की...
त्यानंतर 'गदर-एक प्रेम कथा'वर शंका घेणाऱ्यांबद्दल बोलताना सनी देओल म्हणाला, "इंडस्ट्रीतील काही लोकांना असं वाटत होतं की, यात काही तालमेळ नसल्याने फारसं काही यश मिळणार नाही. मात्र, या चित्रपटाचं यश सर्वांनी पाहिलं आणि त्या गोष्टी कोणीही रोखू शकत नाही."अशा भावना अभिनेत्याने मुलाखतीत व्यक्त केल्या.