'बिग बीं'च्या नातीसोबत जोडलं गेलं नाव! लव्ह लाईफबद्दल बॉलिवूड अभिनेता पहिल्यांदाच बोलला, म्हणतो-"मी प्रेमात पडलो तर…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:28 IST2026-02-16T12:24:18+5:302026-02-16T12:28:25+5:30
लव्ह लाईफबद्दल बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला-"मी प्रेमात पडलो तर…"

'बिग बीं'च्या नातीसोबत जोडलं गेलं नाव! लव्ह लाईफबद्दल बॉलिवूड अभिनेता पहिल्यांदाच बोलला, म्हणतो-"मी प्रेमात पडलो तर…"
Siddhant Chaturvedi: अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) हे हिंदी सिनेसृष्टीतील उभरत्या कलाकारांपैकी एक आहे. गल्ली बॉय या चित्रपटातून त्याने सिनेविश्वात पाऊल ठेवलं.सध्याच्या घडीला त्याची गणना इंडस्ट्रीतील आघाडींच्या नायकांमध्ये केली जाते.'धडक-२', 'गहराईयॉं' यांसारख्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. सध्या हा अभिनेता 'दो दिवाने शहर में'या चित्रपटामुळे चर्चेत आहे.या चित्रपटात त्याची अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत तो स्क्रिन शेअर करत आहे. आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असणारा हा अभिनेता वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकाच चर्चेत राहिला आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या लव्हलाईफबद्दल मोठा खुलासा केला आहे.
एकेकाळी सिद्धांत चतुर्वेदीचं नाव 'बिग बीं'च्या नातीची नव्या नवेली नंदासोबत जोडलं गेलं होतं. त्यावेळी दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा पसरु लागल्या होत्या. मात्र यावर दोघांनीही मौन बाळगणं पसंत केलं.त्यात आता 'दो दिवाने शहर में'च्या प्रमोशननिमित्ताने माध्यमांशी बोलताना सिद्धांतने तो सिंगल असल्याचं स्पष्ट केलं आहे. झुमसोबत संवाद साधताना अभिनेत्याला विचारण्यात आलं की तू खऱ्या आयुष्यात किती रोमॅन्टिक आहेस? त्यावर उत्तर देत तो म्हणाला,"मी एक जिज्ञासू मुलगा आहे, ज्याला जीवन समजून घ्यायचं आहे. शिवाय प्रेम हा आयु्ष्याचा एक मोठा भाग आहे.मी प्रेमात असलो किंवा नसलो तरी माझं खाजगी आयुष्य जपायला मला आवडतं. तसंच मी खरंच प्रेमात पडलो तर ते मला आणखी जपायला आवडेल."
त्यानंतर अभिनेता म्हणाला,"मला माझ्या लव्ह लाईफबद्दल कोणत्याही प्रकारचे आर्टिकल किंवा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय व्हायला नको, असं वाटतं. फक्त माझं काम बोललं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे. त्याचबरोबर जेव्हा मला मी माझं आयुष्य कोणासोबत घालवणार आहे,याची जाणीव होईल, तेव्हा मला तुम्हाला त्याबद्दल प्रत्यक्ष सांगायला आवडेल."
दरम्यान, सिद्धांत चतुर्वेदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो 'दो दिवाने शहर में या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २० फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होत आहे.