शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' रिलीज होत असतानाच पत्नीने लिहिलेली पोस्ट चर्चेत, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 16:56 IST2026-02-13T16:53:45+5:302026-02-13T16:56:17+5:30
"शानदार कहना भी कम है…",शाहिद कपूरच्या ओ रोमियोबद्दल पत्नीने लिहिलेली पोस्ट चर्चेत,म्हणाली...

शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' रिलीज होत असतानाच पत्नीने लिहिलेली पोस्ट चर्चेत, म्हणाली...
Mira Kapoor Post: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा मागील काही दिवसांपासून त्याच्या 'ओ रोमियो' (O romeo) या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आहे. प्रदर्शनापूर्वीच अनेक कारणांमुळे हा सिनेमा चर्चेत होता. अखेर आज १३ फेब्रुवारीला शाहिदीचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, या चित्रपट पाहून प्रेक्षकांसह समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यात शाहिदची पत्नी मीरा कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.
शाहिद कपूरचा ओ रोमियो पाहून त्याची पत्नी भारावून गेली आहे. त्यामुळे मीराने नवऱ्याचं कौतुक करत खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मीराने लिहिलंय, माझा रोमियो, जेव्हा तो मला विचारतो, ''मी आहे की नाही?'', तेव्हा मी त्याला नेहमी सांगते, ''तू आहेस. तू हार मानणाऱ्यांमधला नाही. तु्झ्यात तो आत्मविश्वास आहे. तुझे डोळे शब्दांशिवाय खूप काही बोलतात आणि तुझ्याकडे एक हृदय आहे जे प्रत्येक वेदनेनंतर स्वतःला सावरते.तू एक लकी चार्म आहेस. आता तुझी वेळ आली आहे.त्यासाठी शानदार म्हणणंही कमीच आहे.मला तुझा अभिमान वाटतो. 'ओ रोमियो' प्रदर्शित झाला आहे. अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे. मीरा कपूरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे.
‘ओ रोमिओ’ हा सत्य घटनेवर आधारीत चित्रपट असून यामध्ये शाहिदीसह तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, अविनाश तिवारी, फरिदा जलाल, विक्रांत मेस्सी, तमन्ना भाटिया आणि दिशा पाटनी यांच्याही भूमिका आहेत.