'O Romeo' हिट की फ्लॉप? शाहिद-तृप्तीच्या सिनेमाने १० दिवसांत किती कमावले? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 11:32 IST2026-02-23T11:30:25+5:302026-02-23T11:32:23+5:30

शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो'ची बॉक्स ऑफिसवर कमाल! १० दिवसांचं कलेक्शन ऐकून थक्क व्हाल 

bollywood actor shahid kapoor and tripti dimri o romeo movie box office collection day 10  | 'O Romeo' हिट की फ्लॉप? शाहिद-तृप्तीच्या सिनेमाने १० दिवसांत किती कमावले? जाणून घ्या...

'O Romeo' हिट की फ्लॉप? शाहिद-तृप्तीच्या सिनेमाने १० दिवसांत किती कमावले? जाणून घ्या...

O Romeo Box Office collection : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि तृप्ती डिमरीची (Tripti Dimri) मुख्य भूमिका असलेला ओ रोमियो सिनेमाची हिंदी सिनेसृष्टीत जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमाला रसिक प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. दरम्यान,एकीकडे बॉर्डर-२, धुरंधर ची क्रेझ कायम असताना शाहिदचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व निर्माण करताना दिसतो आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाची संथ सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा फटका ओ रोमिओच्या कलेक्शनला बसला. त्यातही आता हा सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी झाला आहे.  ओ रोमियो प्रदर्शित होऊन जवळपास १० दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यात या सिनेमाने १० दिवसांत किती कमाई केली जाणून घेऊया...

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

विशाल भारद्वाज दिग्दर्शित "ओ रोमियो" चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. चित्रपट आणि कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, पहिल्या आठवड्यात त्याच्या कमाईत चढ-उतार पाहायला मिळाले. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मुसंडी घेत चांगली कमाई केली. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, 'ओ रोमियो'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ८.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यात पहिल्या आठवड्यात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४७.१ कोटींचा व्यवसाय केला. 

दुसऱ्या आठवड्यात किती कमावले?

'सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'ओ रोमियो'ने रिलीजच्या १० व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ३.२५ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. यावरून, या चित्रपटाने १० दिवसांत एकूण ५५.९० कोटी रुपयांची कमाई करत हिट ठरला आहे. 

'ओ रोमियो' सिनेमात तगड्या कलाकारांची फळी पाहायला मिळतेय. शाहिद कपूर, तृप्ती डिमरीसह सिनेमात नाना पाटेकर, अविनाश तिवारी, तमन्ना भाटिया, दिशा पटानी आणि फरीदा जलाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे.

Web Title : 'ओ रोमियो': हिट या फ्लॉप? शाहिद-तृप्ति की फिल्म ने 10 दिनों में की बड़ी कमाई

Web Summary : शाहिद कपूर और तृप्ति डिमरी की 'ओ रोमियो' को मिल रही है लोकप्रियता। शुरुआती धीमी गति और क्रिकेट मैच के प्रभाव के बावजूद, फिल्म ने 10 दिनों में ₹55.90 करोड़ की कमाई की, जिसे हिट माना जा रहा है। फिल्म में नाना पाटेकर सहित कई कलाकार हैं।

Web Title : 'O Romeo': Hit or Flop? Shahid-Tripti film earns big in 10 days.

Web Summary : Shahid Kapoor and Tripti Dimri's 'O Romeo' is gaining traction. Despite initial slow growth and cricket match impacts, the film has grossed ₹55.90 crore in 10 days, deemed a hit. The movie features a strong cast, including Nana Patekar.