अंतिम: ढोलताशांचा गरज अन् कलाकारांची तुफान एनर्जी; 'विघ्नहर्ता'चा मेकिंग व्हिडीओ एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:44 IST2021-09-20T17:42:48+5:302021-09-20T17:44:25+5:30
Vighnaharta: शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सेटवरील गडबड, गाण्याचा आवाज आणि कलाकारांमधील एनर्जी दिसून येत आहे.

अंतिम: ढोलताशांचा गरज अन् कलाकारांची तुफान एनर्जी; 'विघ्नहर्ता'चा मेकिंग व्हिडीओ एकदा पाहाच
अभिनेता सलमान खान याचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता या चित्रपटातील विघ्नहर्ता हे गाणंदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता कमालीची वाढली आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणून धरण्यासाठी चित्रपटाच्या मेकर्सने 'विघ्नहर्ता' या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ शेअर केला आहे.
शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सेटवरील गडबड, गाण्याचा आवाज आणि कलाकारांमधील एनर्जी दिसून येत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला अभिनेता आयुष शर्मा त्याच्या गाण्यातील अनुभव सांगत आहे. तर, दुसरीकडे लगेच अभिनेता वरुण धवनच्या काही डान्स स्टेप दाखवण्यात आल्या आहेत.
विघ्नहर्ता या गाण्याचं कोरिओग्राफ प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मुदस्सर खान याने केलं आहे. हे गाणं बसवत असताना कोणती काळजी घेण्यात आली,कोणत्या गोष्टी विचारात घेण्यात आल्या हे सारं काही मुदस्सर सांगताना दिसत आहे.
'धर्माचा विसर पडला का?' गणपती विसर्जनाच्या 'त्या' फोटोमुळे शाहरुख ट्रोल
'विघ्नहर्ता' गाणं शूट करत असताना आयुषच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र, तरीदेखील त्याने हे चित्रीकरण पूर्ण केलं. तसंच सलमान खानही या गाण्यात हटके अंदाजात झळकला आहे.
दरम्यान, अंतिमचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.