"शेजारी देश आपल्यावर...", पहलगाम हल्ल्याचा रितेश देशमुखने केला निषेध, म्हणाला-"कोणताही देश..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 10:30 IST2025-04-27T10:28:01+5:302025-04-27T10:30:49+5:30
"हे खूपच दु: खद..", रितेश देशमुखने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध, म्हणाला- "कोणताही देश..."

"शेजारी देश आपल्यावर...", पहलगाम हल्ल्याचा रितेश देशमुखने केला निषेध, म्हणाला-"कोणताही देश..."
Riteish Deshmukh: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा सध्या त्याचा आगामी चित्रपट 'रेड-२' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रितेश देशमुखसह (Riteish Deshmukh) अजय देवगण आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या १ मे रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'रेड-२' ची संपूर्ण टीम वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे. याच निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखला पहलगाम हल्ल्याबद्दल (pahalgam terror attack) प्रश्न विचारण्यात आला त्यावर अभिनेत्याने दिलेल्या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकतीच रितेश देशमुखने 'Filmygyan' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याला पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल विचारण्यात आलं, त्यावर प्रतिक्रिया देताना रितेश म्हणाला, "हे खूपच दुःखद आहे. देशभरातून लोक सुट्टीसाठी पहलगामला जातात. अचानक त्या ठिकाणी दहशतवादी येतात आणि गोळीबार सुरू करतात. हा केवळ त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी मोठा धक्का आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ला आपल्या समाजाला तोडण्याचा प्रयत्न करतो.
पुढे अभिनेता म्हणाला, "मला पूर्ण विश्वास आहे की, आपलं सरकार या प्रकरणी कठोर कारवाई करत आहे. कोणताही शेजारी देश आपल्यावर हुकूमशाही करू शकत नाही. यासाठी आपण एकत्र येऊन काश्मीर हा भारताचा भाग आहे, असं त्यांना ठणकावून सांगायला हवं." असं म्हणत अभिनेत्याने पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
दरम्यान, सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे. 'रेड'चा पहिला भाग यशस्वी झाला होता. त्यामुळे 'रेड २' ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे सिनेमा रिलीज झाल्यावर कळून येईलच.