हे वागणं बरं नव्हं! सेल्फीसाठी आलेल्या मुलासोबत रितेशने काय केलं? व्हायरल व्हिडीओची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 08:59 IST2025-06-23T08:53:37+5:302025-06-23T08:59:40+5:30

सेल्फीसाठी आलेल्या मुलासोबत रितेशने केलं असं काही की...; व्हायरल व्हिडीओची चर्चा

bollywood actor riteish deshmukh push young fan hand down who came for selfie video viral  | हे वागणं बरं नव्हं! सेल्फीसाठी आलेल्या मुलासोबत रितेशने काय केलं? व्हायरल व्हिडीओची चर्चा

हे वागणं बरं नव्हं! सेल्फीसाठी आलेल्या मुलासोबत रितेशने काय केलं? व्हायरल व्हिडीओची चर्चा

Riteish Deshmukh Viral Video: बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा त्याचा साधेपणा आणि नम्र स्वभावासाठी ओळखला जातो. सध्या रितेश त्याचा 'हाऊसफुल्ल-५' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. या चित्रपटाची बॉक्स  ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. त्यात अशातच सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

दरम्यान, अलिकडेच रितेश देशमुख त्याची पत्नी जेनेलियासोबत 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचला होता. सध्या 'सितारे जमीन पर' मुळे जिनिलीयाचं देखील सिनेप्रेमी कौतुक करताना दिसत आहे. याच दरम्यानच्या एका व्हिडीओमुळे रितेश आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. 


सोशल मीडियावरबॉलिवूड हेल्पलाईन या अकाउंटवरुन रितेश देशमुखचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये 'सितारे जमीन पर'च्या प्रीमियरदरम्यान रितेश जिनिलियाला चाहत्यांच्या गर्दीतून स्क्रीनिंग हॉलमध्ये घेऊन जात होता. तेव्हा एक मुलगा रितेशकडे आला आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण, रितेशने लगेच हात खाली केला आणि न थांबता पुढे सरकला. त्यावेळी सिक्योरिटी गार्डही त्या मुलाला बाजूला जायला सांगतात. त्यावेळी तो मुलगा निराश झाल्याचं पाहायाला मिळतोय आणि तिथेच उभा राहतो. अक्षरश: त्याचा चेहरा पडतो. कायम डाऊन टू अर्थ असणाऱ्या रितेशचं व्हिडीओमधील वागणं नेटकऱ्यांनी आवडलं नाही. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, "पहिल्यांदा मला रितेशचा attitude आवडला नाही" दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिले, "तुझ्याकडून हे अपेक्षित न्हवतं. अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटल्या आहेत. 

Web Title: bollywood actor riteish deshmukh push young fan hand down who came for selfie video viral