धक्कादायक! आर.माधवनच्या नावाने इन्स्टाग्रामवर 'Fake' अकाउंट, अभिनेता चाहत्यांना सावध करत म्हणाला-"कृपया..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 10:34 IST2026-03-15T10:30:23+5:302026-03-15T10:34:38+5:30
आर.माधवनला सोशल मीडियानवर आला धक्कादायक अनुभव, अभिनेत्याच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट, म्हणाला...

धक्कादायक! आर.माधवनच्या नावाने इन्स्टाग्रामवर 'Fake' अकाउंट, अभिनेता चाहत्यांना सावध करत म्हणाला-"कृपया..."
Bollywood Actor R.Madhavan Post: सध्याच्या काळात सोशल मिडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी सर्वसामान्यासह कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. यामुळे मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या कलाकार मंडळींना फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणं सहज शक्य होतं. मात्र, बऱ्याचदा यामुळे कलाकारांना वाईट अनुभवाला देखील सामोरं जावं लागतं.बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आर.माधवनला देखील असाच काहीसा अनुभव आला आहे.नेमकं काय घडलं? जाणून घेऊया...
सध्या आर. माधवन सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'धुरंधर २' मुळे चर्चेत आहे. अशातच अभिनेता आर. माधवनच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट बनवण्यात आलं आहे. अभिनेत्याने अनेकदा प्रयत्न करूनही हे अकाउंट बंद झालेलं नाही. त्यामुळे त्याने चाहत्यांना या अकाउंटविरोधात रिपोर्ट करा अशी विनंती देखील केली आहे. दरम्यान, सोशळ मीडियावर आर. माधवने स्वत: याबाबत पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्याने सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांना बनावट अकाउंट्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणीतरी त्याच्या नावाचा वापर करून लोकांशी संपर्क साधत आहे आणि त्याच्या टीमचा भाग असल्याचा दावा करत आहे, असा खुलासा अभिनेत्याने या पोस्टद्वारे केला आहे.तसंच आर.माधवनने स्पष्ट केलंय की, त्याचा या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटशी कोणताही संबंध नाही. चाहत्यांनी याला बळी पडू नये म्हणून त्याने फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासनही दिलं आहे.
अभिनेता चाहत्यांना विनंती करत म्हणाला...
आर. माधवन यांने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, "फ्ऱ़ॉड अलर्ट! या व्यक्तीचा माझ्याशी किंवा माझ्या टीमशी काहीही संबंध नाही. ही व्यक्ती सोशल मीडियावर माझा प्रतिनिधी असल्याचा खोटा दावा करत आहे आणि माझ्या परीने लोकांशी संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो आहे. कृपया सावधगिरी बाळगा, हे पूर्णपणे बनावट अकाउंट आहे."
त्यानंतर अभिनेत्याने पुढे म्हटलंय, "माझ्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटशिवाय इतर कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मला रिप्रेझेंट करत नाही. कृपया हे गांभीर्याने घ्या आणि सतर्क रहा. या अकाउंटवर तसेच संबंधित व्यक्तीविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे." आर. माधवन यांनी त्यांच्या पोस्टसोबत बनावट खात्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, जेणेकरून लोक गोंधळून न जाता फेक प्रोफाइल ओळखू शकतील.