जिथे काम करायचे 'त्या' बॉसच्या लेकीवर जडला जीव! जरा हटके आहे परेश रावल यांची प्रेमकहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 18:20 IST2025-10-23T17:59:21+5:302025-10-23T18:20:32+5:30
बॉसच्या लेकीवर जडला जीव अन्...; प्रपोजचा किस्सा आहे फारच फिल्मी

जिथे काम करायचे 'त्या' बॉसच्या लेकीवर जडला जीव! जरा हटके आहे परेश रावल यांची प्रेमकहाणी
Paresh Rawal: दोन भिन्न विचारांचे,वेगळ्या वातावरणात वाढलेल्या दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची केमिस्ट्री भन्नाट जमते, असं म्हणतात. कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची लव्हस्टोरी एकदम भन्नाट आहे. बॉलिवूडचा असा एक अभिनेता ज्याला त्याचं प्रेम सिनेमाच्या सेटवर किंवा इंडस्ट्रीत नाही तर काम करत असलेल्या कंपनीत भेटलं. इ्ंडस्ट्रीतील या हरहुन्नरी अभिनेत्याचं नाव म्हणजे परेश रावल. भूमिका कॉमेडी असो वा गंभीर किंवा खलनायकी त्यांनी पडद्यावर प्रत्येक पात्र जिवंत केलं. परंतु तु्म्हाला माहितीये का? प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात प्रेमविवाह केला आहे. त्यांची लव्हस्टोरी फारच फिल्मी आहे.
एका मुलाखतीत परेश रावल यांनी त्यांची भन्नाट लव्ह स्टोरी सांगितली होती. स्वरुप असं त्यांच्या बायकोचं नाव आहे. त्यांनी स्वरुपला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मित्राला सांगितलं होतं की, मी हिच्याशीच लग्न करणार. दरम्यान, स्वरूप संपत या परेश रावल यांच्या बॉसची मुलगी होत्या. मात्र, त्यांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी तिला लग्नासाठी प्रपोज केलं. दोन-तीन महिने मित्रांशी या विषयावर संवाद साधल्यावर अखेर परेश यांनी स्वरूप संपत यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अखेरीस तब्बल बारा वर्षांनंतर १९८७ मध्ये परेश रावल आणि स्वरूपा संपत यांनी लग्नगाठ बांधली. स्वरूप संपत यांनी 1979 मध्ये स्वरूप संपत यांनी मिस इंडिया किताब जिंकला होता. दोघांनाही दोन मुले आहेत.
दरम्यान, अभिनेते परेश रावल यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते ‘थामा’ चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. लवकरच ते 'हेरा फेरी-३' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.