"१६ ते १८ तास काम केल्यानंतर...", दीपिका पादुकोणच्या 'त्या' मागणीवर पंकज त्रिपाठी यांचं वक्तव्य, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:37 IST2025-06-03T16:35:02+5:302025-06-03T16:37:25+5:30

दीपिकानंतर कलाकारांच्या कामाच्या वेळेबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "१६ ते १८ काम केल्यानंतर"

bollywood actor pankaj tripathi support deepika padukone for 8 Hours shift demand know about what exactly say | "१६ ते १८ तास काम केल्यानंतर...", दीपिका पादुकोणच्या 'त्या' मागणीवर पंकज त्रिपाठी यांचं वक्तव्य, म्हणाले...

"१६ ते १८ तास काम केल्यानंतर...", दीपिका पादुकोणच्या 'त्या' मागणीवर पंकज त्रिपाठी यांचं वक्तव्य, म्हणाले...

Pankaj Tripathi :पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय असं नाव आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर या अभिनेत्याने कलाविश्वात स्वत च एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या पंकज त्रिपाठी एका मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोणचं नाव न घेता कलाकारांच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीचं समर्थन केलं आहे. 

'हॉलीवूड रिपोर्टर इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी यांनी कलाकारांच्या कामाच्या अनिश्चित वेळेबद्दल आपलं मत मांडलं आहे. त्यादरम्यान, ते म्हणाले, "कलाकार कोणत्याही कामासाठी नकार देत नाहीत. पण, त्यांना नाही म्हणता आलं पाहिजे. प्रत्येकाला माहित असले पाहिजे की आपली सीमारेषा आखली पाहिजे. त्यापलीकडे काही नाही." त्यानंतर पंकज त्रिपाठी आपला अनुभव सांगत म्हणाले, "मी देखील सेटवर १६-१८ तास काम केलं आहे. कधीकधी असं वाटायचं की फक्त शरीर काम करत आहे. पण आता मी स्पष्टपणे नकार द्यायला शिकलो आहे."

त्यानंतर पुढे ते म्हणाले, "आपण त्यांच्यासोबत नम्रपणे वागलं पाहिजे, पण तरीही त्यांनी ऐकलं नाही तर एवढचं काम होईल, असं सांगताही आलं पाहिजे. शिवाय आजचं जे काही काम होतं ते पूर्ण झालं आहे, आता आपण उर्वरित काम उद्या करू.असं दिग्दर्शकाला सांगता आलं पाहिजे." असं म्हणत त्यांनी दीपिकाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. 

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, बहुचर्चित 'स्पिरिट' या प्रोजेक्टसाठी दीपिकाने दिवसाला फक्त ८ तास काम करण्याची मागणी केली होती,त्यामुळे चित्रपटातून अभिनेत्राला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, संदीप रेड्डी वांगा यांनी 'स्पिरीट' सिनेमात दीपिकाच्या जागी आता तृप्ती डिमरीची निवड केली आहे. या सिनेमासाठी तृप्ती १० कोटी घेणार आहे. तर दीपिकाने याच सिनेमासाठी तब्बल २० कोटी रुपये मानधनाची मागणी केली होती ज्याची खूप चर्चा झाली. 

Web Title: bollywood actor pankaj tripathi support deepika padukone for 8 Hours shift demand know about what exactly say