"त्याच्यापेक्षा चांगलं काम करुनही...", रणबीर कपूरच्या पदार्पणाच्या पुरस्कारावर बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:23 IST2025-06-06T11:21:15+5:302025-06-06T11:23:34+5:30
अभिनेता रणबीर कपूर हे नाव बॉलिवूड इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांच्या यादीतील एक नाव आहे.

"त्याच्यापेक्षा चांगलं काम करुनही...", रणबीर कपूरच्या पदार्पणाच्या पुरस्कारावर बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली नाराजी
Muzammil Ibrahim : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे नाव बॉलिवूड इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांच्या यादीतील एक नाव आहे. रणबीरने त्याचे आई-वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याने कलाविश्वात स्वत च हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान, २००७ मध्ये रणबीर कपूरने सावरियॉं या चित्रपटातून इंडस्ट्रीत डेब्यू केला. या चित्रपटासाठी अभिनेत्याला बेस्ट डेब्यू अॅक्टर या कॅटेगरीसाठी पुरस्कार मिळाला. दरम्यान, रणबीरसोबतच २००७ मध्ये अभिनेता मुजम्मिल इब्राहिमने देखील बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. परंतु, सध्या हा अभिनेता चर्चेत आला आहे. त्या पदार्पणाच्या पुरस्कासाठी आपण देखील पात्र असल्याचा दावा त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
नुकतीच मुझम्मिल इब्राहिमने सिद्धार्थ कन्नन यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सांगितलं, "रणबीर आणि नील नितीन मुकेश यांनी एकाच वर्षी पदार्पण केलं. त्यावेळी मी देखील महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्या 'धोखा' चित्रपटातून डेब्यू केला. मला आठवतंय त्यावेळी नाना पाटेकर मला म्हणाले होते की, 'तू चांगलं काम केलं आहेस. पण, यावेळी पुरस्कार कदाचित रणबीरला मिळेल'. मला स्वतःला असं वाटतं की मी 'धोखा'मध्ये माझं १००% पेक्षा जास्त दिलं. शिवाय रणबीरपेक्षा चांगलं काम केलं होतं. पण जर तुम्ही 'सावरिया'तील त्याच्या कामाची आणि 'धोखा'मधील माझ्या कामाची तुलना केली तर मला वाटतं की मी खरंच चांगला परफॉर्मन्स दिला होता. इरफान खाननेही महेश भट्ट यांना सांगितले होतं की, 'धोखा'सारखी भूमिका प्रत्येकजण करू शकत नाही.पण, आता मला अभिनेता म्हणून रणबीर आवडतो."
पुढे अभिनेता म्हणाला, 'मला पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित देखील केलं गेलं नव्हतं. मला वाटलं होतं की हे शो ऑस्करसारखे निष्पक्ष असतील, पण इथे सर्वकाही आधीच ठरवलं जातं. त्यावेळी जेव्हा शाहरुख खान स्टेजवर आला आणि विजेत्याची घोषणा केली तेव्हा त्याने माझं नाव घेतलं आणि म्हणाला की या स्टेजवर मुझम्मिल देखील असणं गरजेचं. तसेच पुरस्कारासाठी देखील पात्र आहे. त्या क्षणाने मला अगदी हादरवून टाकलं. मला असं वाटलं की कोणी ऐकत नाहीये. मला रडावंसं वाटलं, मी तुटलो होतो." असा खुलासा अभिनेत्याने केला.
वर्कफ्रंट
मुजम्मिल एक सुपरमॉडेल आहे. त्याने पूजा भटच्या धोखा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'विल यू मॅरी मी', 'हॉर्न ओके प्लीज' यांसारख्या चित्रपटांमध्येही तो झळकला आहे.