गेल्या १० वर्षांपासून गायब आहे 'मुन्नाभाई MBBS' मधील 'हा' अभिनेता! लेकाच्या भेटीसाठी आई आजही पाहतेय वाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:06 IST2025-08-29T11:58:04+5:302025-08-29T12:06:46+5:30

गेली १० वर्षांपासून गायब आहे 'मुन्नाभाई MBBS' मधील 'हा' अभिनेता! नेमकं प्रकरण काय?

bollywood actor munna bhai mbbs fame actor vishal thakkar missing from last 10 years mother waiting for him know about her  | गेल्या १० वर्षांपासून गायब आहे 'मुन्नाभाई MBBS' मधील 'हा' अभिनेता! लेकाच्या भेटीसाठी आई आजही पाहतेय वाट 

गेल्या १० वर्षांपासून गायब आहे 'मुन्नाभाई MBBS' मधील 'हा' अभिनेता! लेकाच्या भेटीसाठी आई आजही पाहतेय वाट 

Bollywood Actor: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे स्वतःला मुख्य भूमिकेत सिद्ध करण्यासाठी सतत धडपड करत राहिले. शिवाय काहीजण या झगमगत्या दुनियेत हरवून गेले. अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता विशाल ठक्कर हे त्यातीलच एक नाव आहे. संजय दत्तचा २००३ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस'तो अखेरचा दिसला.गेली १० वर्ष हा अभिनेता गायब आहे? सध्या तो कुठे आहे?  काय करतो याबद्दल कोणालाच काही माहिती नाही.

अभिनेता विशाल ठक्करने 'चांदनी बार' या चित्रपटातून त्याच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर त्याचं नशीब फळफळलं. चांदनी बार नंतर त्याला थेट संजय दत्तसोबत मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील त्याचं काम अनेकांच्या पसंतीस उतरलं होतं.त्याचबरोबर विशाल टीव्ही मालिका'टँगो चार्ली','क्यूंकी सास भी कभी बहू थी' तसेच 'किस देश में है मेरा दिल'सारख्या चित्रपटांमध्येही दिसला. मात्र,प्रेयसीने विशालवर  बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्याचं करिअर पूर्णपणे संपुष्टात आलं .  बेपत्ता होण्यापूर्वी विशाल आणि त्याच्या प्रेयसीमध्ये मोठा वाद झाला होता.मात्र, त्यानंतर प्रेयसीने तिची तक्रार मागे घेतली होती.

एके दिवशी विशाल ठक्करने त्याच्या आईकडून चित्रपट पाहण्यासाठी ५०० रुपये घेतले आणि निघून गेला.त्यानंतर एका पार्टीसाठी जात असल्याचा मेसेज त्याने घरच्यांना केला. मात्र त्यानंतर तो कधी घरी परतलाच नाही.विशालचा कोणताही पत्ता लागला नाही आणि दोन वर्षांनंतर त्याची प्रेयसीही तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.

Web Title: bollywood actor munna bhai mbbs fame actor vishal thakkar missing from last 10 years mother waiting for him know about her 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.