अखेर जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' सिनेमा 'या' तारखेला होणार रिलीज; सत्य घटनेवर आधारीत कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:44 IST2025-01-17T12:41:37+5:302025-01-17T12:44:17+5:30
जॉन अब्राहमच्या 'डिप्लोमॅट' सिनेमाच्या रिलीज डेटचा खुलासा झालाय. या सिनेमाच्या कहाणीचाही खुलासा केलाय (the diplomat)

अखेर जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' सिनेमा 'या' तारखेला होणार रिलीज; सत्य घटनेवर आधारीत कहाणी
जॉन अब्राहमचा बहुचर्चित आगामी सिनेमा म्हणजे 'डिप्लोमॅट'. या सिनेमाचं पहिलं पोस्टर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. तेव्हाच या सिनेमाची चर्चा सुरु झाली होती. आता 'डिप्लोमॅट' सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज झालंय. या पोस्टरवर जॉन अब्राहमचा डॅशिंग लूक दिसून येतोय. या सिनेमाच्या रिलीजला मुहुर्त मिळाला असून रिलीज डेट जाहीर करण्यात आलीय. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे.
'डिप्लोमॅट' सिनेमाची कहाणी काय?
जॉन अब्राहम या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. जॉन या सिनेमात एका भारतीय राजदूताची भूमिका साकारणार आहे. हा भारतीय राजदूत पाकिस्तानात असलेल्या एका भारतीय मुलीला परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो. या मुलीला पाकिस्तानात जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडलं जातं. ही एक सत्य घटना असून 'डिप्लोमॅट' सिनेमात ती कशी रंगवली जाणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
या तारखेला रिलीज होणार 'डिप्लोमॅट'
'डिप्लोमॅट' सिनेमात जॉन अब्राहमसोबत अभिनेते कुमुद मिश्रा, शरीब हाश्मी, सादिया खतीब हे कलाकार झळकणार आहेत. 'डिप्लोमॅट' हा सिनेमा ७ मार्च २०२५ ला रिलीज होणार आहे. जॉन अब्राहम आपल्याला २०२४ मध्ये आलेल्या 'वेदा' सिनेमात दिसला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळाला तरी जॉनच्या अभिनयाचं कौतुक झालं. आता 'डिप्लोमॅट' सिनेमातून जॉनच्या अभिनयाची चमक कशी दिसणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.