प्रदर्शनापूर्वीच हृतिक रोशन- ज्युनिअर एनटीआरचा 'वॉर-२' ठरतोय हिट; कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:13 IST2025-07-03T18:11:27+5:302025-07-03T18:13:45+5:30
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर स्टारर 'वॉर-२' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रदर्शनापूर्वीच हृतिक रोशन- ज्युनिअर एनटीआरचा 'वॉर-२' ठरतोय हिट; कमावले इतके कोटी
War-2 Movie : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan)आणि ज्युनिअर एनटीआर (Hrithik Roshan) स्टारर 'वॉर-२' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वॉर-२ हा सिनेमा २०१९ साली प्रदर्शित झालेल्या वॉर चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सिनेमा येत्या १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.
दरम्यान, 'वॉर २'मध्ये हृतिक रोशन आणि ज्यूनिअर एनटीआरसह कियारा अडवाणीचीही मुख्य भूमिका आहे. पण, आता रिलीजपूर्वीच कमाल केली आहे. या चित्रपटाचे राइट्स ज्या किंमतीला विकले गेले आहेत ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे तेलुगू राइट्स ८० कोटींमध्ये विकले गेले आहेत. त्यामुळे चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच आपला दबदबा निर्माण केल्याचं दिसत आहे.
'वॉर २'च्या टीझरमध्ये अॅक्शन, थरार आणि स्टार पॉवर पाहायला मिळतेय. याआधी २०१९ मध्ये आलेल्या 'वॉर' या चित्रपटात ऋतिक रोशनने रॉ एजंट कबीरची भूमिका साकारली होती. 'वॉर २' मध्ये ऋतिक पुन्हा एकदा त्याच भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे, ज्युनिअर एनटीआर या चित्रपटातून हिंदी सिनेमात पदार्पण करत आहेत. तर कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे.