"संपूर्ण पॅन्ट रक्ताने माखली होती...", गोळी लागल्याच्या 'त्या' घटनेबद्दल गोविंदाच्या लेकीने पहिल्यांदाच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:51 IST2025-10-24T12:47:12+5:302025-10-24T12:51:50+5:30
जेव्हा गोविंदाला स्वत:च्याच बंदूकीतून लागलेली गोळी! लेकीने सांगितला भयावह घटनाक्रम, म्हणाली...

"संपूर्ण पॅन्ट रक्ताने माखली होती...", गोळी लागल्याच्या 'त्या' घटनेबद्दल गोविंदाच्या लेकीने पहिल्यांदाच सांगितलं
Govinda :बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा नव्वदच्या दशकातील लोकप्रिय नायकांपैकी एक आहे.'कुली नंबर-१','राजा बाबू' सारखे सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला देऊन त्याने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. दरम्यान, गतवर्षी त्याला बंदुकीच्या गोळीने दुखापत झाल्याने प्रचंड चर्चेत आला होता. परवानाधारक बंदुकीची सफाई करत असताना चुकून त्याच्या गुडघ्याच्या खाली गोळी लागली होती.त्यानंतर अभिनेत्याला मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.डॉक्टरांनी गोविंदाच्या पायातून गोळी काढली आणि आता अभिनेता पूर्णपणे बरा आहे. आता त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याबद्दल अभिनेत्याची मुलगी टीनाने एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.
'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाची लेक टीनाने म्हटलं, गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती प्रचंड भावुक झाली होती. त्या घटनेबद्दल बोलताना टीनाने सांगितलं, "त्यावेळी मी देवाजवळ खूप प्रार्थना केली. ते पूर्णपणे बरे झालेले पाहून मी प्रचंड खुश होते. डोळ्यात आनंदाअश्रू तरळत होते. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. असं असतानाही चीचीला औषधे अँटीबायोटिक्स घ्यायचे नव्हते, या सर्व गोष्टी त्यांना आवडत नाहीत. एखादा माणूस कोणत्याही गोष्टीशी एकट्याने लढत असतो तेव्हा अनेक विचार मनात येतात. आता काय? आणि कसं होईल? मी त्यावेळी आयसीयूच्या बाहेर असायचे आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करायचे."
पांढरे कपडे रक्ताने माखलेले...
त्यानंतर पुढे टीना त्या प्रसंगाविषयी म्हणाली, "जेव्हा त्यांच्या पायाला गोळी लागली तेव्हा मी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. त्यादिवशी त्यांना एका इव्हेंटसाठी जायचं होतं. सकाळची फ्लाईट होती. त्यासाठी त्यांनी पांढरा शर्ट आणि पॅन्ट तसंच त्यावर पांढरा जॅकेट घातला होता. गोळी लागल्यावर त्यांची पॅन्ट पूर्ण रक्ताने माखली होती." असं वक्तव्य अभिनेत्याच्या लेकीने केलं.