बाप सुपरस्टार अन् लेकीचं करिअर ठरलं फ्लॉप! 'या' अभिनेत्रीला कास्ट करण्यात निर्मात्यांना वाटायची भीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:00 IST2025-10-24T16:52:02+5:302025-10-24T17:00:54+5:30
वडिलांची प्रसिद्धी कामी नाही आली; अभिनेत्रीला कास्ट करण्यात निर्मात्यांना वाटायची भीती? व्यक्त केलं दु:ख

बाप सुपरस्टार अन् लेकीचं करिअर ठरलं फ्लॉप! 'या' अभिनेत्रीला कास्ट करण्यात निर्मात्यांना वाटायची भीती?
Tina Ahuja: अभिनेत्यांच्या मुलांनी अभिनेता किंवा अभिनेत्री होणं हे चित्रपटसृष्टीसाठी नवीन नाही. पण केवळ चित्रपटसृष्टीत येणं महत्वाचं नाही तर इथे टिकणं व नाव कमावणंही तितकंच महत्वाचं आहे. हे सुख काही मोजक्याच स्टार किड्सच्या नशीबी आलं. तर काहींच्या पदरी फक्त निराशा, अपयश आलं. त्यातील एक नाव म्हणजे टीना अहुजा. वडीलांची अभिनय परंपरा पुढे सुरु ठेवत टीनाने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. मात्र, तिला करिअर फारसं घडलं नाही.
गोविंदाची लेक टीनाने २०१५ मध्ये 'सेकंड हॅंड हसबंड' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर टीना एकही चित्रपटात दिसली नाही. तिने काही म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केलं आहे. वडील इंडस्ट्रीतील सुपरस्टार असूनही त्याचा तिच्या करिअरसाठी काही फायदा झाल्याचं दिसलं नाही. यावर स्पष्टीकरण देत टीनाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. अलिकडेच फिल्मीग्यान ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं, खरं सांगायचं झाल्यास माझ्यासाठी काम मिळणं अवघड झालं. काही लोक तर मला चित्रपटात कास्ट करण्यासाठी घाबरायचे.
यानंतर पुढे टीना यामागचं कारण सांगत म्हणाली, "एक वेगळीच अफवा पसरवण्यात आली होती की गोविंदा सेटवर येईल, तो काहीतरी बोलेल असंच अनेक जणांना वाटायचं. पण, मी आतापर्यंत जे काही प्रोजेक्ट्स केले त्यादरम्यान, कधीच असं काही घडलं नाही. बाबांच्या बाबतीत खोटी अफवा पसरवली. खरंतर एक तो उत्तम माणूस आहे. मी बाबांसोबत ऑनकॅमेरा आणि ऑफकॅमेरा देखील काम केलं आहे. त्यामुळे अशा गोष्टी ऐकणं माझ्यासाठी धक्कादायक होतं. त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. याउलट मी अॅक्टिंग क्लासेसला देखील जायचे.पण त्यांच्याकडून जे शिकले ते मला आयुष्यभर पुरेल इतकं आहे.आज मी जे काही करतेय आहे, त्यातच मी खुश आहे." असा खुलासा टीना अहुजाने केला.