एकत्र आले, गळाभेट केली अन्...; अखेर ७ वर्षानंतर गोविंदा आणि भाचा कृष्णा अभिषेकमधील अबोला मिटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:54 IST2024-11-28T15:50:29+5:302024-11-28T15:54:28+5:30
जवळपास ७ वर्षानंतर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या मंचावर अभिनेता गोविंदा तसेच कृष्णा अभिषेक या मामा-भाचाची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे.

एकत्र आले, गळाभेट केली अन्...; अखेर ७ वर्षानंतर गोविंदा आणि भाचा कृष्णा अभिषेकमधील अबोला मिटला
Govinda and krushna Abhishek Reunite: सध्या हिंदी कलाविश्वात कॉमेडियन कपिल शर्मा याचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा बोलबाला आहे. अलिकडेच या शो दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या शोचा नवीन प्रोमो तुफान व्हायरल होताना दिसतोय. याचं कारणही तितकंच खास आहे. जवळपास ७ वर्षानंतर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या मंचावर अभिनेता गोविंदा तसेच कृष्णा अभिषेक या मामा-भाचाची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरील 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या दुसऱ्या सीझनमधील नव्या प्रोमोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या शोमध्ये अभिनेता गोविंदा तसेच शक्ती कपूर आणि चंकी पांडे हे कलाकार हजेरी लावणार आहेत. त्यासोबत व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. या भागात गोविंदा आणि कृष्णा एकत्र आल्याने मामा-भाच्यांमधील वाद आता संपला असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे. शिवाय या प्रोमोमध्ये गोविंदाने कृष्णाला मिठी मारल्याचं पाहायला मिळतंय. त्यासोबतच दोघे एकमेकांची चेष्टादेखील करत आहेत.
या शोच्या दमदार प्रोमोमध्ये कृष्णा अभिषेक मामा गोविंदाला मिठी मारतो आणि म्हणतो, "आपण खूप दिवसांनी असे भेटलो आहोत, आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही.पुढे गोविंदाचं कौतुक करत कृष्णा म्हणतो, 'हिरो नं-१', 'कुली नं-१', 'मामा नं-१' त्यावर रिप्लाय देत गोविंदा म्हणतो की, 'मामा नं-१' याचा अर्थ काय आहे? हलक्यात घेऊन मामा बनवतोय का? त्यावर सगळे हसतात आणि कृष्णालाही हसू आवरत नाही. या व्हायरल प्रोमोमध्ये कृष्णाची बहिण आरतीची झलक देखील पाहायला मिळते आहे.