पडद्यावर किसिंग सीन पाहून पत्नीची काय प्रतिक्रिया असते? इमरान हाश्मीने सगळंच सांगितलं, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:37 IST2026-03-24T15:34:45+5:302026-03-24T15:37:33+5:30

इमरान हाश्मीचे किसींग सीन पाहून अशी असायची पत्नीची प्रतिक्रिया, अभिनेता खुलासा करत म्हणालेला...

bollywood actor emraan hashmi once talk about his wife rection on her kissing and bold scene in movies | पडद्यावर किसिंग सीन पाहून पत्नीची काय प्रतिक्रिया असते? इमरान हाश्मीने सगळंच सांगितलं, म्हणाला...

पडद्यावर किसिंग सीन पाहून पत्नीची काय प्रतिक्रिया असते? इमरान हाश्मीने सगळंच सांगितलं, म्हणाला...

Emraan Hashmi: बॉलिवूड इंडस्ट्रीतील सिरियल किसर म्हणून ओळख असणारा अभिनेता इमरान हाश्मीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आपल्या दमदार लूक्स आणि अभिनयाने चर्चेत असणाऱ्या इमरान हाश्मीने २००३ मध्ये विक्रम भट्ट यांच्या 'फुटपाथ' या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. चित्रपटातील त्याचा अभिनय आणि भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर 'आशिक बनाया आपने', 'मर्डर', 'एक थी डायन' तसेच 'टायगर ४', 'ग्राउंड झिरो' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप  प्रेक्षकांवर उमटवली.आज या अभिनेत्याचा वाढदिवस आहे. 

इमरान हाश्मीला त्याच्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे  सिरिअल किसरचा टॅग देण्यात आला. मात्र, चित्रपटातील त्याचे बोल्ड आणि किसिंग सीन पत्नीची काय प्रतिक्रिया असते. यावर एका मुलाखतीत अभिनेत्याने भाष्य केलं होतं. एका जुन्या मुलाखतीमध्ये इमरानने 'सिरीयल किसर'चा टॅग आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलला. त्यादरम्यान, अभिनेत्याने सांगितलं होतं की, त्याची पत्नी परवीन साहनी हिला त्याचे किसिंग सीन देणे अजिबात आवडत नव्हते. त्याला इतर अभिनेत्रींना किस करताना पाहून तिला राग यायचा. 

'रेडिफ' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने म्हटलं, "जेव्हा लोक मला सिरीयल किसर म्हणून ओळखणं ते मला अजिबात आवडत नाही. मी यावर अनेकदा आक्षेप घेतला आहे, पण आपण काहीच शकत नाही.चित्रपटांमधील त्या सीन्समुळे माझ्या कुटुंबिक जीवनावर परिणाम झाला. तसंच माझी पत्नी परवीन किसींग सीन पाहून रागवायची. सुरुवातीला अनेक समस्या आल्या, माझ्या वडिलांनाही हे सर्व आवडलं नाही. पण, एक अभिनेता म्हणून तुमच्याकडे दुसरा पर्यायही नसतो. त्यानंतर सर्व काही चांगलं झालं आणि आता या सगळ्याची सवय होत गेली." असं अभिनेत्याने सांगितलं होतं. 

Web Title : इमरान हाशमी ने बताया किसिंग सीन पर पत्नी की प्रतिक्रिया

Web Summary : बॉलीवुड के 'सीरियल किसर' इमरान हाशमी ने बताया कि उनकी पत्नी परवीन को उनके किसिंग सीन पसंद नहीं थे। वह गुस्सा हो जाती थीं। बाद में, उन्हें आदत हो गई।

Web Title : Emraan Hashmi Reveals Wife's Reaction to His Kissing Scenes

Web Summary : Emraan Hashmi, known as Bollywood's 'serial kisser,' shared his wife Parveen's initial dislike for his kissing scenes. She would get angry, and his family wasn't happy. Eventually, they got used to it.