धर्मेन्द्र यांची पहिली कार, अगदी नव्याकोऱ्या कारसारखी...; किंमत पाहून चकित व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 13:45 IST2021-10-12T13:42:25+5:302021-10-12T13:45:04+5:30

Dharmendra shares video of his first car : होय, धरमपाजींनी त्यांच्या पहिल्या कारचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ही पहिलीवहिली कार आजही त्यांनी जीवापाड जपून ठेवली आहे.

bollywood actor dharmendra shared a video of the first car fiat in marathi | धर्मेन्द्र यांची पहिली कार, अगदी नव्याकोऱ्या कारसारखी...; किंमत पाहून चकित व्हाल

धर्मेन्द्र यांची पहिली कार, अगदी नव्याकोऱ्या कारसारखी...; किंमत पाहून चकित व्हाल

ठळक मुद्देधर्मेन्द्र  लवकरच ‘अपने 2’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत सनी, बॉबी ही त्यांची मुलं आणि नातू करण प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र ( Dharmendra ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. गतकाळातील अनेक आठवणी, किस्से ते सोशल मीडियावर शेअर करतात. तूर्तास चर्चा आहे ती त्यांच्या एका खास व्हिडीओची. होय, धरमपाजींनी त्यांच्या पहिल्या कारचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ही पहिलीवहिली कार आजही त्यांनी जीवापाड जपून ठेवली आहे.
ही कार म्हणजे, काळ्या रंगाची फियाट. आजही ती अगदी नव्या कोऱ्या कारसारखी चमकते. या कारच्या अनेक आठवणी त्यांनी या व्हिडीओत शेअर केल्या आहेत. ‘मित्रांनो, फियाट...माझी पहिली कार, माझं मुलं. ही माझ्या हृदयाच्या जवळ आहे. एका संघर्ष करणा-या तरूणाला परमेश्वराचा आशीर्वाद आहे...,’ या कॅप्शनसह त्यांनी या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे


 
18 हजार रूपयांना खरेदी केली होती ही आलिशान गाडी 

 धर्मेन्द्र यांनी ही गाडी 18 हजार रूपयांना खरेदी केली होती.  1960 साली त्यांनी ही कार खरेदी केली होती. काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये धर्मेन्द्र यांनी गाडीची एक आठवण त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, ‘स्ट्रगल काळात मी सायकलने शूटींगला जायचो. थोडं यश मिळाल्यावर माझ्या मित्रांनी मला कार खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मी एक कार खरेदी केली. मी त्या गाडीला अतिशय सांभाळून ठेवलं होतं. कारण अभिनयक्षेत्रात टिकलो नाही तर ही कार टॅक्सी म्हणून चालवता येईल, असा विचार माझ्या डोक्यात होता. पहिली कार खरेदी केल्यावर मी सर्वप्रथम बिमल रॉय यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी मला गाडीत फिरवशील का? असं अगदी लहान मुलासारखं विचारलं होतं.’ 
धर्मेन्द्र यांनी 1960 मध्येच फिल्मी करिअर सुरू केलं होतं. यानंतर त्यांनी एकापेक्षा हिट सिनेमात काम केलं. धर्मेन्द्र  लवकरच ‘अपने 2’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत सनी, बॉबी ही त्यांची मुलं आणि नातू करण प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

Web Title: bollywood actor dharmendra shared a video of the first car fiat in marathi