बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र झळकलेत 'या' मराठी सिनेमात; विक्रम गोखले होते मुख्य भूमिकेत, तुम्ही पाहिलाय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:29 IST2025-11-24T14:24:03+5:302025-11-24T14:29:02+5:30
धर्मेंद्र झळकलेत 'या' मराठी सिनेमात; विक्रम गोखले होते मुख्य भूमिकेत, तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र झळकलेत 'या' मराठी सिनेमात; विक्रम गोखले होते मुख्य भूमिकेत, तुम्ही पाहिलाय का?
Dharmenra Work In Marathi Movie: मनोरंजनविश्वातून एक दुखद बातमी समोर आली आहे.बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे.१९७०-८० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकणारे धर्मेंद्र ८९ वर्षांचे होते. आपल्या दमदार अभिनयाने प्रत्येक भूमिकेत जीवंतपणा आणणारा हा नायक काळाच्या पडद्याआड गेला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांच्यावर घरी आणण्यात आलं होतं आणि घरच्या मंडळींच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते. धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टी एका हरहुन्नरी कलाकाराला मुकली आहे.
धर्मेंद्र यांनी आपल्या कारकरिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९६० मध्ये आलेल्या दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून केली. परंतु, तुम्हाला माहितीये का एकीकडे बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांनी आपल्या मैत्रीखातर एका मराठी सिनेमात काम केलं. जेष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी एका मुलाखतीत धर्मेंद्र यांची आठवण शेअर केली होती. मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम यांचे मित्र होते. त्यावेळी मैत्रीसाठी धर्मेंद्र यांनी हेमंत कदम यांच्या हिच काय चुकलं या चित्रपटातील एका गाण्यासाठी शूटिंग केलं होतं. 'घेऊन टांगा सर्जा निघाला, दूर धन्याचा गाव... अरे तू धाव', असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात त्यांनी विक्रम गोखलेंसोबत अभिनय केला होता.
'हिचं काय चुकलं' हा चित्रपट साल १९८५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात विक्रम गोखले, विजय कदम, रंजना असे तगडे कलाकार होते. त्याकाळी धर्मेंद्र यांचं ते घेऊन टांगा सर्जा निघाला हे गाणं चांगलंच गाजलं होतं.